
नेवासा (दि.03 ऑक्टोबर):-तालुक्यातील उस्थळ दुमाला येथील वारूबाई किसन पिटेकर यांचे वृद्धापकाळाने बुधवारी (दि.04) रोजी निधन झाले.मृत्यूसमयी त्यांचे वय 81 वर्षे होते.
पंचक्रोशीत व आप्तेष्टांमध्ये त्या वाराम्मा नावाने परिचित होत्या. त्यांच्यामागे मुळा एज्युकेशन सोसायटीत असलेले रामप्रसाद, अनिल तसेच बहिणी, भाऊ, मुली, जावई, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. गत काही दिवसांपासून त्यांची प्रकृती ठिक नव्हती. त्यामुळे त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, बुधवारी सकाळी त्यांच्या प्रकृती अचानक खालावली. त्यातच त्यांचे निधन झाले. त्यांचा दशक्रिया विधी शुक्रवारी दि. 13 ऑक्टोबर रोजी उस्थळ दुमाला हायस्कूलजवळ, ता. नेवासा येथे होणार आहे. अॅड. राहुल पिटेकर यांच्या त्या आजी होत.