
अहमदनगर (दि.९ ऑक्टोबर):-भारत विरुध्द ऑस्ट्रेलीया क्रिकेट मॅचवर बेटींग (सट्टा) घेणाऱ्या आरोपीस नगर शहरातील पटवर्धन चौक येथुन रोख रक्कम व मोबाईलसह स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे.
बातमीतील हकीकत आशिकी,जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.राकेश ओला यांनी पोनि/श्री.दिनेश आहेर स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांना जिल्ह्यातील अवैध धंद्यांची माहिती घेवुन कारवाई करणे बाबत आदेशित केले होते.नमुद आदेशान्वये पोनि/श्री.दिनेश आहेर,स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर हे अवैध धंद्यांची माहिती घेत असताना गुप्तबातमीदाराकडून माहिती मिळाली की,विशाल आनंद हा पटवर्धन चौक, अहमदनगर येथील राहते घरा जवळ काही इसमा सोबत सध्या चालु असलेल्या भारत ऑस्ट्रेलीया क्रिकेट मॅचवर बेकायदा पैसे लावुन बेटींग (सट्टा) खेळत आहे आता गेल्यास मिळुन येईल अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोनि/श्री.दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अंमलदारांचे पथक नेमुन,पंचाना सोबत घेवुन मिळालेल्या बातमीनुसार खात्री करुन कारवाई करणे बाबत आवश्यक सुचना देवुन पथकास तात्काळ रवाना केले.पथकाने पंचाना सोबत घेवुन बातमीती नमुद ठिकाणी पटवर्धन चौक,अहमदनगर येथे जावुन खात्री केली असता एक इसम मोबाईलचे स्क्रिनवर भारत विरुध्द ऑस्ट्रेलीया क्रिकेटचा सामना सुरु होता व 2 ते 3 इसम गोलाकार बसुन मोबाईल फोनवर बोलताना दिसले.
पथकाची खात्री होताच अचानक छापा टाकला असता पोलीस पथकाची चाहुल लागताच दोन इसम पळुन गेले व एका इसमास ताब्यात घेतले.ताब्यात घेतलेल्या इसमास पोलीस पथकाची ओळख सांगुन त्याचे नाव गांव विचारले असता त्याने त्याचे नाव 1) विशाल आनंद (रा.पटवर्धन चौक,अहमदनगर) असे असल्याचे सांगितले.त्याची पंचासमक्ष अंगझडती घेता, त्याचे अंगझडतीत रोख रक्कम व 22,500/- रू.चा.मोबाईल फोन मिळुन आल्याने आरोपीस मुद्देमालासह ताब्यात घेवुन त्याचे विरुध्द कोतवाली पोलीस स्टेशन गु.र.नं.1202/2023 महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12 (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील कायदेशिर कार्यवाही कोतवाली पोलीस स्टेशन करीत आहे.सदरची कारवाई श्री.राकेश ओला पोलीस अधीक्षक,श्री.प्रशांत खैरे अपर पोलीस अधिक्षक व श्री.अनिल कातकाडे उपविभागीय पोलीस अधिकारी,नगर शहर विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोहेकॉ/अतुल लोटके,पोकॉ/रविंद्र घुंगासे, रणजीत जाधव,सागर ससाणे यांनी केलेली आहे.