Maharashtra247

स्नेहालय संपूर्ण सुरक्षा केंद्र अहमदनगर आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

अहमदनगर (दि.११ ऑक्टोबर):-महाराष्ट्र राज्य एडस् प्रतिबंध व नियंत्रण संस्था,जिल्हा एडस् प्रतिबंध व नियंत्रण विभाग एकात्मिक सल्ला समुपदेशन तपासणी केंद्र,स्नेहालय संपूर्ण सुरक्षा केंद्र अहमदनगर,दि साल्वेशन आर्मी बुथ हॉस्पिटल महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मुकुंदनगर परिसरात मोफत वैद्यकीय तपासणी उपचार शिबिर घेण्यात आले.

शिबीरात करून २०० ते २५० नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.शिबिराप्रसंगी डॉ.शहनाज अय्युब बाल रोग तज्ञ,डॉ.अशपाक पटेल एम.डी मेडिसिन,डॉ.अयमन अन्सारी जनरल फिजिशियन,डॉ. प्रियांका शर्मा स्री रोग तज्ञ, डॉ.ममता कांबळे दंतचिकित्सक,मेजर सुनील साळवे,प्रवीण साळवे,सीयोन साळवे,मेजर देवदान कळकुंबे,एकात्मिक सल्ला समुपदेशन तपासणी केंद्र समुपदेशक शर्मिला कदम, प्रयोगशाळा तंत्रज्ञ तृप्ती मापारी,संपूर्ण सुरक्षा प्रकल्प व्यवस्थापक सागर फुलारी, अरबाज शेख,आरती भोर, आरती डोखे,गौरव राऊत, फारुख शेख,सा.कार्यकर्ते, हाजी अमजद पैलवान, शिबिर समन्वयक अमित पठारे,युसुफ सय्यद,वसीम खान,आदी मान्यवर उपस्थित होते.

शिबिराप्रसंगी उपस्थित नागरिकांचे मोफत सर्व निदान व आरोग्य तपासणी करण्यात आली.शिबिरात गरोदर माता यांची तपासणी,त्याच बरोबर दातांचे काही समस्या असेल तर दातांची तपासणी करण्यात आली.तसेच शिबिरामध्ये सर्व रुग्णांची मोफत रक्त शर्करा,रक्तदाब, एचआयव्ही,गुप्तरोग, कावीळ,थायरॉईड,मलेरिया, सिरम कॅल्शियम,विविध रक्त तपासण्या करण्यात आल्या. एच आय व्ही व एड्स यामधील फरक,आपण एच. आय व्ही ची तपासणी का करावी याबाबत माहिती सांगण्यात आली व जनजागृती करण्यात आली. मोफत वैद्यकीय औषधउपचार देण्यात आले. शिबिरात एकुण ८० ते ९५ लोकांनी आपली एच.आय व्हीं ची तपासणी करून घेतली. शिबिर यशस्वी ते साठी विशेष सहकार्य बुथ हॉस्पिटल,वसीम खान,शेख फारूख,आरती भोर,आरती डोखे, गौरव राऊत,अरबाज शेख यांनी परिश्रम घेतले.

You cannot copy content of this page