
अहमदनगर (दि.१९ ऑक्टोबर):-शाळा महाविदयालया पासुन 100 मिटर अंतरावर असलेल्या टपरीधाकांवर तोफखाना पोलीस व महानगरपालिकेची संयुक्त कारवाई;दि.दि. 19 ऑक्टोबर 2023 रोजी तोफखाना पोलीस स्टेशन व महानरगरपालिकेचे वतीने सिताराम सारडा विदयालय, रेसिडेस्नीयल विदयालय,सारडा कॉलेज जवळील तंबाखुजन्य पदार्थ विकणारे टपरीधारकावर सामाईक कारवाई करुन शाळा कॉलेजच्या आवारात विनाकरण फिरणारे टारगट मुलांवर कारवाई करुन महानगरपालिकेच्या वतीने अतिक्रमणामध्ये असलेल्या टप-यावर कारवाई करण्यात आली.
तसेच पोलीसांकडून कोप्टा (COPTA) कायदया अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री.राकेश ओला,अपर पोलीस अधीक्षक श्री.प्रशांत खैरे,उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.अनिल कातकाडे यांचे मार्गदर्शनाखाली पोनि.श्री मधुकर साळवे,पोउपनिरी सचिन रणशेवरे,पोहेकॉ/ दत्तात्रय जपे,पोहेकॉ/सुनिल शिरसाट,पोना/सलीम शेख, पोना/अविनाश वाकचौरे यांचे पथकासोबत महानरगरपालिकेचे अतिक्रमण विभागाचे प्रमुख व त्यांचे सहकाऱ्यांनी केली.