
अहमदनगर (दि.२५ ऑक्टोबर):-स्पर्धा परीक्षेत विध्यार्थानी खचून न जाता प्रयत्न केल्यास यश नक्कीच मिळते असे प्रतिपादन सहायक राज्यकर आयुक्त दत्तात्रय भिसे यांनी केले.
भिंगार येथील रयत शिक्षण संस्थेचे श्रीमती ॲबट मायादेवी गुरुदित्ताशाह हायस्कूल व ज्युनियर कॉलेज येथे विध्यार्थाना करियर मार्गदर्शन व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी सहायक राज्यकर आयुक्त दत्तात्रय भिसे,स्नेहबंध सोशल फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ.उद्धव शिंदे,प्राचार्य व्ही.एल.नरवडे, पद्मजा सुरकुटला, वर्षा साठे, सुरेखा डोईफोडे, संजीवनी खंडागळे, मीरा शिंदे, आकांक्षा पडदुणे, प्रतीक्षा सोनवणे, राजेंद्र काळे, शंकर मोरे, माधव रेवगडे, गोविंद जऱ्हड, श्रीकांत देवकर सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी भिसे पुढे म्हणाले, स्पर्धा परीक्षेमध्ये मलाही पहिल्या प्रयत्नामध्ये यश आले नाही, मी खचून न जाता प्रयत्न करत होतो. या प्रयत्नांना यश येऊन मी शासकीय अधिकारी झालो.
भिसे यांनी विद्यार्थ्यांचे मन रमेल व समजेल अशा गोष्टीद्वारे स्वतःचा जीवनपट सांगितला. प्राथमिक, माध्यमिक शिक्षण ते अधिकारी होण्यापर्यंतचा प्रवास व संघर्ष विद्यार्थ्यांसमोर मांडला.प्राचार्य व्ही.एल. नरवडे यांनी विद्यालयाची माहिती सांगितली. तसेच स्नेहबंधचे अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे यांना डॉक्टरेट मिळाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करून व त्यांनी राबविलेल्या समाजकार्याबद्दल त्यांचे कौतुक केले. प्रास्ताविक प्राचार्य व्ही.एल. नरवडे, सूत्रसंचालन वर्षा साठे व आभार प्रतीक्षा सोनवणे यांनी केले.