फसवणूक टाळण्यासाठी सतर्क रहा पोनि.चंद्रशेखर यादव;सायबर सुरक्षिततेसाठी कोतवाली पोलिसांकडून जनजागृती;व्यापारी नागरिकांना कोतवाली पोलिसांकडून पोस्टरचे वाटप
नगर (दि.७ नोव्हेंबर):-वाढत्या सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी तसेच नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी कोतवाली पोलिसांकडून पोस्टर्सचे वाटप केले जात आहे.
कापड बाजारातील व्यापाऱ्यांचे मीटिंग वेळी सदर कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.आपली फसवणूक होऊ नये, यासाठी मोबाईल हाताळताना सतर्क राहणे गरजेचे असल्याचे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी यावेळी सांगितले.दिवाळीचे पार्श्वभूमीवर शहरातील व्यापारी, नागरिकांना चोरी आणि फसवणूक टाळण्यासाठी व खबरदारी घेण्यासाठी कोतवाली चे पोलीस निरीक्षक यादव यांनी मीटिंग घेतली. यावेळी इतर सूचना देत पोस्टर्सचे वाटपची सुरुवात करण्यात आली.एकूण १० हजार पोस्टरचे वाटप केले जाणार आहेत.
नागरिकांकडून सायबर गुन्हे घडू नयेत म्हणून आवश्यक खबरदारी घेतली जात नसल्याने सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढत आहे. मोबाईलचा वाढलेला वापर तसेच ऑनलाईन पैशांची देवाणघेवाण यातून सायबर गुन्हे घडत आहेत. काही वेळा सायबर चोरांकडून होत असलेल्या फसवणुकीची कल्पना येत नाही व मोठी फसवणूक होते. कोणत्याही अनोळखी व्यक्तीच्या क्रमांकावर आलेली मेल किंवा लिंकवर क्लिक करु नये, कोणतेही लोन ॲप मोबाईलमध्ये डाऊनलोड करु नये, सोशल मीडियावर अनोळखी व्यक्तींसोबत ओळख वाढवू नये, कोणालाली बॅंकची वैयक्तीक माहिती शेअर करु नये, अशा काही सूचना पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी केल्या आहेत. दिवाळीमुळे कापड बाजारात खरेदीसाठी आलेल्या नागरिकांना सायबर जनजागृतीबाबत पोस्टर्स वाटप केले जात आहेत.
सदर मीटिंगवेळी व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष श्याम देडगावकर सेक्रेटरी किरण व्होरा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष ईश्वर बोरा संभव काठेड सतीश मुथा दीपक नवलांनी रवी गांधी देवेंद्र भट्टेजा रवि किथानि ऋषि येवलेकर, योगेश गांधी चंद्रकांत चोपडा इतर व्यापारी उपस्थित होते.
याबाबत घ्या काळजी
डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर, त्यामध्ये असणारे धोके, ऑनलाइन व्यवहार करताना घ्यायची काळजी आदी बाबींवर पोस्टर्सच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली. मोबाइलचा वापर अनावश्यक अपलोड किंवा डाउनलोडसाठी करू नये, आपला पासवर्ड परिचित व्यक्तीलाही सांगू नये, फसव्या मेलपासून सावध राहावे, अशी माहिती कोतवाली पोलिसांकडून देण्यात येत आहे.
फसवणूक झाल्यास तत्काळ संपर्क करा
ऑनलाईन आर्थिक फसवणूक झाल्यास तत्काळ बॅंकेशी संपर्क करुन अकाऊंट बंद करावे तसेच डेबिट फ्रीज करावे. फसवणूक झाल्याची माहिती सायबर पोलिसांच्या १९३० या हेल्पलाईन क्रमांकावर द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.