Maharashtra247

चिंचोली गुरव येथे सती माता मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे आयोजन

संगमनेर (राजेंद्र मेढे):-संगमनेर तालुक्यातील चिंचोली गुरव येथे सती माता प्राणप्रतिष्ठा सोहळा आयोजित करण्यात आला आहे.मेढे परिवार व समस्त चिंचोली गुरव ग्रामस्थ यांच्या वतीने या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची रूपरेषा बुधवार दि.८ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ ते ११ वा. मूर्ती ग्राम प्रदक्षिणा मिरवणूक,प्रधान संकल्प पंचांग विधी वास्तुपूजन,मूर्ती जलाधी वास तसेच दुपारी मंडप देवता स्थापन अग्नि निर्माण गृहयज्ञ आरती गुरवार दि.९ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ ते १ संकल्प स्थापित देवता पूजन मूर्ती स्नपन संस्कार दुपारी प्रधान हवन मूर्ती शल्य दिवस,धान्य दिवास सायंकाळी पूजन आरती शुक्रवार दि.१० नोव्हेंबर सकाळी ९ ते १२ वा. स्थापित देवता पूजन,मंडप देवता हवन,उत्तरांग बलिदान, मूर्ती प्राणप्रतिष्ठा पूर्णाहुती, आरती दुपारी १० ते १२ हभप विनोदाचार्य समाज प्रबोधनकार विश्वनाथ महाराज नवले यांचे कीर्तन व त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होईल तरी पंचक्रोशीतील सर्व नागरिकांनी ग्रामस्थांनी या सोहळ्यास उपस्थित रहावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page