भिंगार कॅम्प पोलिस स्टेशन व शांतता कमिटी यांच्या संयुक्त विद्यमाने उत्कृष्ट गणेश विसर्जन मिरवणुक व उत्कृष्ट आरास स्पर्धा साकारणाऱ्या मंडळांना भिंगार कॅम्प पोलिसांकडून पारितोषिक वितरण
अहमदनगर (दि.८ नोव्हेंबर):-भिंगार गणेश विजर्सन मिरवणुकीत उत्कृष्ट पद्धतीने व पारंपरिक वाद्यांच्या गजरात उत्कृष्ट मिरवणूक काढणाऱ्या भिंगार शहरातील श्री.मानाचा देशमुख गणपती व श्री.गणेश तरुण मंडळ ब्राम्हण गल्ली यांना संयुक्त प्रथक क्रमांक तर मैत्री प्रतिष्ठाण ट्रस्ट संघर्ष तरुण मंडळ-व्दितीय पारीतोषीक,भिंगार अर्बन को.ऑप बॅक-तृतीय क्रमांक व उत्कृष्ट आरास स्पर्धा सम्राट मंडळ ट्रस्ट गवळीवाडा-प्रथम क्रमांक,अमरज्योत तरुण मंडळ व्दितीय क्रमांक,जय महाराष्ट्र तरुण मंडळ बेरड गल्ली-तृतीय क्रमांक तसेच स्पर्धेमध्ये सहभागी इतर सहभागी झालेल्या गणेश मंडळांना उतेजनार्थ प्रमाणपत्र श्री.अनिल कातकाडे उप विभागीय पोलीस अधिकारी नगर शहर विभाग यांचे हस्ते वितरण करण्यात आले.
यासाठी पर्यवेक्षक परीक्षकांची समितीचे डॉ.श्री.उध्दव शिंदे सर,श्री.अरविंद कुडीया सर,श्री.रोहित परदेशी सर यांनी परीश्रम घेतले.यावेळी बोलतांना श्री.अनिल कातकाडे म्हणाले की,ज्या मंडळांनी ङि.जे मुक्त मिरवणुक काढली व आरस मध्ये सामाजीक व सकारात्मक संदेश देणाऱ्या मंडळांचे अभिनंदन करुन जास्तीत जास्त मंडळांनी स्पर्धेत पुढील वर्षी सहभाग नोंदवावा असे आवाहन केले त्याच प्रमाणे भिंगार कॅम्पचे प्रभारी अधिकारी श्री.दिनकर मुंडे यांनी सुध्दा पुढील वर्षी जास्तीत जास्त मंडळांनी स्पर्धेमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले.