दोन दुचाकींच्या धडकेत वकील तरुणी जबर जखमी
अहमदनगर (दि.१७ नोव्हेंबर):-मोपेड दुचाकीला भरधाव मोटारसायकलने दिलेल्या धडकेत मोपेडवरील वकील तरुणी जखमी झाली.याबाबत तोफखाना पोलीस ठाण्यात मोटारसायकल स्वाराविरुद्ध अपघातास कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
श्रुती किशोरकुमार हालदार (वय २७ वर्षे धंदा- वकिली,रा.कौशल्यानगरी,पाईपलाईन रोड सावेडी) असे अपघातात जखमी झालेल्या वकील तरुणीचे नाव आहे.श्रुती या दिनांक १२ नोव्हेंबर रोजी रात्री पावणे अकराच्या सुमारास मेडिकल मधून औषध आणण्यासाठी बहीण संस्कृती हिच्या बरोबर भिस्तबाग चौकात एमएच १६ सीपी ५०६० या मोपेड दुचाकीवर आल्या होत्या.
जाताना बहिण संस्कृती गाडी चालविण्यासाठी बसली.भिस्तबाग चौकाकडून श्रीराम चौकाकडे जात असताना साई मेडीकल जवळील चौकातून वळण्यासाठी इंडिकेटर देऊन वळत असताना पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या एमएच १६ बी एन ६०५८ या दुचाकीस्वाराने त्यांना उजव्या बाजूने धडक दिली.त्यात दोघीही खाली पडून जखमी झाल्या तर मोपेडचेही मोठे नुकसान झाले.