
शेवगाव प्रतिनिधी (दि.२० नोव्हेंबर):-शेवगाव तालुक्यातील मुरमी गावचे सरपंच शेषराव वंजारी यांचे बोधेगाव येथुन आरोपींनी अपहरण केले असता शेवगाव पोलिसांनी १२ तासाच्या आत करमाळा येथुन सरपंचाची सुटका करून आरोपीना गजाआड केले.

बातमीची हकीकत अशी की,दि.१९ नोव्हेंबर २०२३ रोजी सांयकाळी ०५ वा.चे सुमारास मुरमी गावचे सरपंच शेषराव वंजारी हे मोटार सायकलवर बोधेगाव येथिल केदारेश्वर साखर कारखाना चौकात फळे घेण्यासाठी थांबले असता अचानक पांढऱ्या रंगाच्या ईरटिका गाडी नं.एम. एच.१४ जे.ई.८३२७ मधून अज्ञात तीन व्यक्तीनी अपहरण करुन घेवुन गेले.

याबाबत आशाबाई शेषराव वंजारी रा.मुरमी.ता. शेवगाव) यांनी शेवगाव पोलीस स्टेशनला फिर्याद दिली. शेवगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांनी तात्काळ तपास पथक तयार करुन रवाना केले. त्यांना गुप्त बातमीदाराने दिलेल्या माहितीच्या आधारे करमाळा पोलीस स्टेशन ता.करमाळा जिल्हा सोलापुर येथे पाठवून अपहरण कर्ते आरोपी १) नितीन जग्गनाथ तहकिक रा. वांगी ता.करमाळा जि. सोलापुर २) नितीन बबन भोसले रा.बावडा ता.इंन्दापुर जिल्हा-पुणे यांना पकडुन अपहरित व्यक्ती श्री.शेषराव वंजारी रा.मुरमी ता.शेवगाव यांची त्यांचे ताब्यातून सुखरुप सुटका केली तसेच अपहरण करण्यासाठी वापरण्यात आलेली ईरटिका गाडी नं.एम एच १४ जे.ई.८३२७ हि जप्त केली.
सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला,अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी संपत भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरिक्षक/विलास पुजारी,पोसई/बोकिल, पोहेकॉ/राजेंन्द्र ससाणे,पोना/ नितीन भताने,पोना/सुधाकर दराडे,पोना/ईश्वर गर्जे,पोकॉ/ ज्ञानेश्वर सानप यांनी केली आहे.गुन्हयाचा पुढील तपास पोसई/अमोल पवार हे करीत आहेत.