
अहमदनगर (दि.२० नोव्हेंबर):-खंडणीच्या गुन्हयामध्ये फरार असणा-या सराईत आरोपीला पकडण्यात एमआयडीसी पोलिसांना यश आले आहे.

एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे गुरजिनं ९१५/२०२३ भादविक ३८४,३८६,३२७,४५२,३४ अन्वये दि.०३/१०/२०२३ रोजी गुन्हयातील फरार आरोपी १) विशाल दिपक कापरे (रा.चेतना कॉलनी,नवनागापुर ता. जि.अहमदनगर) हा सदरचा गुन्हा केल्यापासुन फरार होता.
सदरचा आरोपी हा राहत्या घराच्या परिसरात आल्याची गोपनीय माहिती सपोनि/राजेंद्र सानप यांना मिळाली.त्यावरुन त्यांनी पोलीस स्टेशनचे एक पथक तयार करुन चेतना कॉलनी परीसरात सापळा रचुन आरोपीला शिताफीने जेरबंद केले.पकडलेला आरोपी हा सराईत गुन्हेगार असुन त्याचेवर चार गुन्हे दाखल आहेत.
ही कारवाई राकेश ओला पोलीस अधीक्षक, प्रशांत खैरे अपर पोलीस अधीक्षक,संपतराव भोसले उपविभागीय पोलीस अधिकारी नगर ग्रामीण विभाग यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि/राजेंद्र सानप,पोसई/ दिपक पाठक,पोना/महेश बोरुडे,पोना/संदीप चव्हाण, पोना/गणेश पालवे,पोना/संतोष नेहुल,पोकॉ/नवनाथ दहिफळे,मोबाईल सेलचे पोकॉ/राहुल गुंडू यांनी केली आहे.
