
अहमदनगर (दि.२१ नोव्हेंबर):-स्नेहालय संचलित उडान प्रकल्प,अहमदनगर जिल्हा महिला व बाल विकास विभाग,जिल्हा बाल संरक्षण कक्ष,चाईल्ड हेल्पलाईन आणि उत्कर्ष बालभवन यांच्या संयुक्त विद्यमाने सिद्धार्थनगर सेवा वस्ती मध्ये जागतिक बाल हक्क दिवस साजरा करण्यात आला.

लहान मुले ही देवाघरची फुले असे म्हटले जाते. शारीरिक व मानसिक अपरिपक्वतेमुळे या फुलांची अधिक काळजी व संगोपन करावे लागते.त्याच प्रमाणे त्यांना कायद्यान्वये संरक्षणही द्यावे लागते.

त्यांना फुलविण्याकरिता चांगले आरोग्य, सुरक्षितता, सुरक्षित पाणी,पोषक अन्न, शिक्षण, सुरक्षितता इ.प्रदान करण्याची आवश्यकता असते. या सुविधा समाजातील सर्व बालकांना मिळत नाहीत.आजही आपण स्त्रीभृण हत्या,बालकामगार,बालविवाह इ .समाजामध्ये घडतांना बघतो.ह्या समस्यांवर मत करण्यासाठी बालकांची जात, वर्ण,लिंग,भाषा,धर्म यांचा विचार न करता जगातील प्रत्येक बालकाला सर्वांगिण विकासाचा हक्क असून त्याला सुखी व समृद्ध जीवन उपलब्ध व्हावे या हेतूने संयुक्त राष्ट्रसंघाने 20 नोव्हेंबर 1959 रोजी बालकांचे जन्मजात हक्क घोषित करणारा जाहीरनामा प्रस्तुत केला आणि तेव्हापासून 20 नोव्हेंबर हा दिवस जागतिक बालहक्क दिन म्हणून साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून स्नेहालय संचलित उडान प्रकल्प, अहमदनगर जिल्हा महिला व बाल विकास विभाग, जिल्हा बाल संरक्षण कक्ष, चाईल्ड हेल्प लाईन आणि उत्कर्ष बालभवन यांच्या संयुक्त विद्यमाने सिद्धार्थ नगर सेवा वस्ती मध्ये बालविवाह व बाल लैंगिक अत्याचारापासून संरक्षण घेऊन किशोरवयीन मुलीं आणि बालकांमध्ये जनजागृती घडून आणण्याचा दृष्टिकोनातून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या वेळी जिल्हा बाल संरक्षण अधिकारी वैभव देशमुख अध्यक्ष भाषण करताना बालकांचे अधिकाराविषयी ओळख करून देताना सांगितले की, बालकांना त्याचे अधिकारापासून वंचित राहू नये यासाठी आम्ही सक्रिय आहोत. संयुक्त राष्ट्राच्या बाल हक्क संहितेत एकूण 54 कलमे आणि 4 मुख्य अधिकार आहेत.
1)जगण्याचा अधिकार
2)विकासाचा अधिकार 3)सुरक्षिततेचा अधिकार
4)सहभागाचा अधिकार आहे. पण सध्या 18 वर्षाच्या आत मुलींचे बालविवाह लाऊन देण्याचे प्रमाण वाढल्याने या बालविवाह बळी पडलेल्या बालकांचे बाल अधिकार चे उल्लंघन होत असे. त्यामुळे प्रत्येक बालकाने पदवी घेतल्या शिवाय लग्न करणार नाही असा आज बाल हक्क दिनाच्या दिवशी निर्धार करावे असे आवाहन केले. यानंतर उडान प्रकल्पाविषयी माहिती उडान प्रकल्पा अंतर्गत अहमदनगर जिल्हा बालविवाह मुक्त जिल्हा करणे ध्येय समोर ठेवून अहमदनगर जिल्ह्यात काम करणार आहोत. बालकांमध्ये वेगवेगळे खेळ घेऊन जागतिक बाल दिवस साजरा करण्यात आला.
ह्या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कलाम बालभवनचे समन्वयक सौ.विना वड्डेपल्ली यांनी केले. प्रस्तावना स्नेहालय संचालित उडान प्रकल्प व्यवस्थापक श्री. प्रविण कदम यांनी केले. चाईल्ड हेल्प लाईनचे समुपदेशक कु.मंजुषा गावडे यांनी आभार मानले.हा कार्यक्रम व्यवस्थित पार पाडण्याकरिता चाईल्ड हेल्प लाईनचे आलीम पठाण, शाहीद शेख, अब्दुल खान, सीमा कांबळे, राहुल वैराळ, उडान प्रकल्पाचे कल्पना देशमुख, बालभवन प्रकल्पाचे विना वड्डेपल्ली व शिक्षक यांनी परिश्रम घेतले.