
अहमदनगर (दि.२२ नोव्हेंबर):-घरफोडी करणाऱ्या आरोपीस मुद्देमालासह पकडण्यात तोफखाना पोलीसांना अवघ्या दोन तासात यश आले आहे.

तोफखाना पोलीस स्टेशन येथे गु.र.नं -1632/2023 भा.दि.व कलम 457,380 प्रमाणे दाखल गुन्हयातील फिर्यादी मृत्युजंय कुमार दामोरपसास सिंग हे दि.18 नोव्हेंबर 2023 रोजी 12.00 वाजेच्या सुमारास घराला कुलुप लावुन भाजी आणन्या करीता गेले असता कोणीतरी अज्ञात आरोपीनी त्यांचे घराचे कुलुप तोडून दरवाजावाटे आत प्रवेश करुन त्यांचे कपाटातील 8000/- रु.रोख रक्कम व 2000/-रु किंमतिची मोबाईलची पावर बॅक असा मुद्देमाल चोरी केला होता.
घडलेल्या घटनेवरून तोफखाना पोलिस ठाण्याचे पोनि.श्री.मधुकर साळवे यांना मिळालेल्या गोपनीय माहीतीच्या आधारे आरोपी हा बोल्हेगाव येथील गणेश चौकात असल्याची माहिती मिळाली तत्काळ पोलिस निरीक्षक साळवे यांनी पोलिस अमलदारांना सूचना करून आरोपीस ताब्यात घेण्यास सांगितले.
पोलीस अंमलदारांनी आरोपी डेविड प्रकाश दिवे रा.गणेश चौक बोल्हेगाव यास ताब्यात घेवुन त्याकडे चौकशी केली असता त्याने चोरलेला मुद्देमाल काढून दिला.हि कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला,अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे,उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकाडे यांचे मार्गदर्शनाखालील पो.नि.श्री मधुकर साळवे,पो.उपनिरी सचिन रणशेवरे,पोकॉ/ बाळासाहेब भापसे,पोकॉ/ शिरीष तरटे,पोकॉ/दत्तात्रय कोतकर,पोकॉ/सतीष भवर यांनी केली असुन पुढील तपास मपोहेकॉ/प्रमिला गायकवाड करीत आहेत.
