लोकनेते बाळासाहेब थोरात महाविद्यालयात रंगला माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा.!!
संगमनेर (दत्तात्रय घोलप):-संगमनेर तालुक्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी नवसंजीवनी ठरलेल्या तळेगाव दिघे येथील लोकनेते बाळासाहेब थोरात कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय तसेच माजी विद्यार्थी संघ यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार दिनांक २० नोव्हेबर २०२३ रोजी सकाळी ११ वाजता नाशिक पदवीधर मतदारसंघाचे माजी आमदार डॉक्टर सुधीरजी तांबे यांच्या अध्यक्षतेखाली माजी विद्यार्थी स्नेह मेळावा उत्साहात व आनंददायी वातावरणात पार पडला आहे.
तब्बल १५ वर्षानंतर महाविद्यालयातील कला, वाणिज्य व विज्ञान शाखेमधील विद्यार्थी एकत्र आल्याने हा स्नेह मेळावा अविस्मरणीय ठरला आहे. यानिमित्त अनेक माजी विद्यार्थ्यांनी जुन्या रमणीय आठवणींना उजाळा देत विद्यालयातील शिक्षकांचे ऋण व्यक्त केले.लोकनेते बाळासाहेब थोरात कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयाची नॅक नामंकान मिळवण्यासाठी वाटचाल सुरू आहे.यशस्वी घोडदौड व महाविद्यालयाच्या वाटचालीमध्ये माजी विद्यार्थ्यांचेही भरीव योगदान असावे.
आपण आजावर ज्या महाविद्यालयात शिकलो.शिक्षणरूपी संस्कार घेतले त्या विद्यालयाचा आपण काहीतरी देणं लागतो आपण देखील आपल्या विद्यालयाला आपल्या यथाशक्ती योगदान द्यावे असे आव्हान कार्यक्रमाच्या आयोजकांसह माजी आ.डॉ.सुधीरजी तांबे यांनी केले.याप्रसंगी सह्याद्री बहुजन विद्या प्रसारक समाज संस्थेचे रजिस्टर बि.आर.गावंदे,महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर.डी.डी.पवार,प्रा.लावरे,प्रा. मच्छिंद्र नेहे,माजी विद्यार्थी संघाचे चेअरमन राजेंद्र पानसरे,माजी विद्यार्थी पत्रकार दत्तात्रय घोलप, संजीवनी सोनवणे,माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष विशाल गोर्ड,शुभम कांदळकर,सोनवणे यांनी मनोगत व्यक्त केले.तर माजी विद्यार्थी मेळाव्यास तळेगाव दिघे ग्रामपंचायतचे माजी लोकनियुक्त सरपंच बाबासाहेब कांदळकर,शेतकी संघाचे संचालक सचिनभाऊ दिघे,माजी विद्यार्थी संघाचा सचिव महेश शिंदे,प्रा.कविता कोटकर,अक्षय कवाडे,नामदेव मुळे,प्रदीप दिघे,दिप्ती त्रिभवून,स्वाती गोडगे,वर्षा उकिरडे,पूजा दिघे,जीवन चत्तर,श्याम सोनवणे,अमोल कांदळकर यांसह सर्वच माजी विद्यार्थी सर्व शिक्षक वृंद कर्मचारी वृंद उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक रामदास आहेर यांनी केले तर आभार प्राध्यापक राजेंद्र गायकवाड यांनी मानले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी लोकनेते बाळासाहेब कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे सर्व शिक्षक व माजी विद्यार्थी संघ यांनी विशेष परिश्रम घेतले आहे.यावेळी महाविद्यालयाच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी अल्पोहाराचे नियोजन करण्यात आले होते.२००८ साली सुरू झालेल्या कॉलेजच्या प्रथमच स्नेह मेळावा संपन्न झाल्याने सर्वच माजी विद्यार्थिनी आनंद व्यक्त केला आहे.