कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हयातील जप्त तसेच बेवारस मिळून आलेल्या दुचाकी व चारचाकी वाहनांचा होणार लिलाव
अहमदनगर (दि.२२ नोव्हेंबर):-दि.२५/११/२०२३ रोजी कोतवाली पोलीस स्टेशन अहमदनगर येथे होणारे दुचाकी वाहन मुद्देमालाचे उघड लिलाव (Open auction) बाबत..
कोतवाली पोलीस ठाणे अभिलेखावर सन १९७५ ते २०११ पर्यंत पोलीस ठाण्यात गुन्हयात जप्त, बेवारस मिळवुन घेवून निषन्न झालेले दुचाकी व चारचाकी वाहने मागील सहा महीन्यात तिन टप्यात मूळ मालकांना देण्यात आले.
१)पहील्या टप्यात दुचाकी चारचाकी मिळून एकूण १९ वहाने रक्कम १५ लाख २)दुसऱ्या टप्यात एकूण दुचाकी २२ वाहने रक्कम १० लाख ३)तिसऱ्या टप्यात चारचाकी/दुचाकी असे एकुण ५४ वाहने रक्कम रुपये ३५ लाख रुपये किमतीचा असा एकुण ६० लाख रुपये किंमतीचा मुददेमाल सबंधीत मालकांना देण्यात आलेला आहे.कोतवाली पोलीस ठाणे अभिलेखावर सन १९७५ ते २०१९ पावेतो पोलीस ठाण्याचे अभिलेखावर बेवारस तसेच अभिलेखावर नसलेले दुचाकी वाहने बऱ्याच दिवसांपासून पडून ऊन,वारा, पाऊसाने गंज लागून खराब होत आहे.
तसेच सदरची वाहने पोलीस ठाण्याचे आवारात ब-याच दिवसांपासून पडून राहील्याने जागेची अडचण निर्माण होत असल्याने अशा १५९ वाहनांची उपप्रादेशीक परिवहन अधिकारी, अहमदनगर यांचेकडून लिलावाचे अनुषंगाने मुल्यांकन करण्यात आलेले आहे.मुल्यांकन केलेल्या १५९ दुचाकी वाहनांचे लिलावा बाबत तहसीलदार, नगर भाग,अहमदनगर यांना पत्र व्यवहार करुन त्यांनी सदर वाहनांचे मालकी हक्का बाबत उदघोषणापत्र आदेश जारी करुन तो सार्वजनिक ठिकाणी चिकटविण्या व प्रसारीत करणे बाबत आदेश निर्गमित केल्याप्रमाणे सार्वजनिक ठिकाणी सदरचे आदेशाची अंमलबजावणी करण्यात येवून तहसीलदार नगर भाग,अहमदनगर यांनी नमुद दुचाकी वाहनांचे उघड लिलाव (Open auction) बाबत परवानगी दिली.त्या अनुषंगाने सोमवार दि. २७/११/२०२३ रोजी सकाळी ११/०० वा. कोतवाली पोलीस ठाणे आवारात उघड लिलाव (Open auction) चे आयोजन करण्यात येणार आहे.तसेच ईच्छुक भंगार विक्रेते यांनी सदर लिलावात सामिल होणे करीता देण्यात आलेल्या अटी व शतिचे पालन करुन अमानत रक्कम रुपये १० हजार ही शनिवार दि.२५/११/२०२३ रोजी सकाळी १०/०० ते १२/०० या वेळेत संबधीतांकडे जमा करणे आहे.सदर उघड लिलाव (Open auction) मध्ये सहभागी होणारे भंगार विक्रीते करीता खालील प्रमाणे अटी व शति ठेवण्यात आलेल्या आहे.तसेच 27 नोव्हेंबर 2023 रोजी वाहनांचा लिलाव होणार आहे.
१. लिलावात सहभागी होणारे व्यक्तीस आपले शासन मान्य भंगार विक्रीता परवाना, नावानिशी GST नंबर,मनपाचा शॉप अॅक्ट परवाना आवश्यक आहे.नमुद कागदपत्रा शिवाय लिलावात सहभागी होता होणार नाही.
२. लिलावात सहभागी होण्याकरीता अमानत रक्कम रुपये १०,०००/- (दहा हजार) आगाऊ भरावी लागेल.
३. सदरचा भंगार लिलाव हा उघड लिलाव (Open auction) पध्दतीचा असल्याने चढ्या भावाने बोली लावण्यात येईल.ज्या व्यक्तीची बोली जास्त रकमेची जाईल त्यास भंगार लिलावातील वाहने अदा केली जातील.
४. चढ्या भावाने शेवटची बोली स्थिर झालेनंतर जी व्यक्ती भंगार लिलाव घेईल त्याची होणारी रक्कम रोख स्वरुपात जागेवरच पोलीस ठाण्यात जमा करावी लागेल,
५.लिलाव मधील सर्व वाहनांचे इंजिन व चेसीस पोलीस ठाण्याचे आवारातच मोकळे करुन त्याचे सुटटे भाग करुन इंजिनचे कास्टींग मटेरिअल जागीच VDO चित्रीकरणात नाश करण्याची जबाबदारी लिलाव घेणारे व्यक्तीची राहील.सदरचे चित्रीकरणाची चित्रफीत पोलीस ठाण्यात जमा करावी लागेल,वाहनाचे इतर सुटटे भाग अखंड घेवून जाण्याची मुभा राहील.
६.लिलाव प्रक्रिये समयी लिलाव घेणारे व्यक्ती व्यतिरीक्त इतर कोणतेही हस्तक/सहकारी सोबत उपस्थित रहाणार नाही.
७.भंगार लिलाव प्रक्रिया चे नेमलेल्या तारखेत कायदा व सुव्यवस्थे मुळे अचानक बदल झाल्यास पुढील तारीख कळविण्यात येईल.
८.भंगार लिलावा बाबत अगावू शंका माहीती प्राप्त करुन घ्यावी,नंतर काही एक तक्रार चालणार नाही.
९.अधिक माहीती करीता कोतवाली पोलिस ठाण्यातील पोहेकॉ/२०१८ शेख तनवीर मो.नंबर ९९२३ ७०७१७० = पोहेकॉ/५५, दिपक साबळे मो.नंबर ९३७० ८०४५४७ यांच्याशी संपर्क करावा.