रेशनिंगचे काळ्या बाजारात जाणारे ९ लाख रुपयांचं धान्य जप्त शेवगाव पोलिसांची कारवाई
शेवगाव प्रतिनिधी (दि.२४. डिसेंबर):-सरकारमान्य धान्य हे गोरगरीब लाभार्थ्यांना न देता काळ्या बाजारात विक्रीसाठी नेण्यात येत असताना शेवगांव पोलिसांनी सरकारमान्य ३० टन ९ लाख रुपयाचे धान्य जप्त केल आहे.दि.२३ डिसेंबर रोजी रात्री ही कारवाई करण्यात आली. ट्रकमधून हे धान्य नेलं जात होतं.विशेष म्हणजे या धान्य साठविण्यासाठी रेणूकानगर भागात अवैधरित्या गोडावून तयार करण्यात आलं होतं. पोलिसांनी हे अवैध गोडावून सील केल आहे.शेवगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाण्याच्या कर्मचार्यांसह महसूलचे कर्मचार्यांनी ही कारवाई केली आहे.