Maharashtra247

येशू ख्रिस्ताचा जन्म जगाला तारण्यासाठी-रेव्ह.भालचंद्र कांबळे

नगर प्रतिनिधी (दि.२५.डिसेंबर):-नगर येथील ऐतिहासिक हयूम मेमोरियल चर्चमध्ये ख्रिस्तजन्मोत्सवा मुळे मोठ्या भक्तीचे आयोजन केले होते.यावेळी प्रमुख वक्ते रेव्ह.भालचंद्र कांबळे पुणे यांनी संदेश दिला.भक्तीला प्रार्थनेने सुरवात करण्यात आली रेव्ह.विद्यासागर भोसले यांनी ही प्रार्थना केली.यावेळी ते म्हणाले की येशू ख्रिस्ताचा जन्म मानवाच्या तारणासाठी झालेला आहे.येशू ख्रिस्ताचा जन्म हा मानवा साठी सुवार्ता आहे.हीच जगासाठी मंगल वार्ता आहे. देवाने जगावर एवढी मोठी प्रिती केली की,त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला यासाठी की,जो कोणी त्याचेवर विश्वास ठेवतो त्याचा नाश होउ नये तर त्याला सार्वकालीक जीवन प्राप्त व्हावे.देवाने दिलेल्या या वचना प्रमाणे मानवाला पापा पासून मुक्ती मिळावी व स्वर्गीय राज्य प्राप्त व्हावे यासाठी येशू ख्रिस्ताला या जगात पाठविले आहे.येशू ख्रिस्त जगामध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी या जगात आलेला आहे,पिता, पुत्र व पवित्र आत्मा हे त्रेक्य असून समसमान आहेत. मानवाने जशी आपणावर तशीच आपलया शेजा-यावर प्रिती करावी.कारण देव प्रिती आहे.आज अनेक बलाढय राष्ट्रांमध्ये अशांतता आहे.जग अणवस्त्राच्या सावटा खाली जगत आहे.अशा परिस्थित आज फक्त आध्यात्मच या संकटा पासून मानवाला वाचवू शकते. कोरोना या विशाणूने पुन्हा एकदा जगामध्ये भितीचे वातावरण निर्माण केलेले आहे.या विषाणूच्या प्रादुर्भावा पासून मानवाचे रक्षण होण्या करीता आपण नियमांचे पालन करुन प्रभु जवळ प्रार्थना करावी.येशू आरोग्य देणारा जिवंत देव आहे.या बोधपर संदेशा नंतर चर्चचे मुख्य धर्मगुरु यांनी त्यांचे आभार मानले व प्रार्थना केली.चर्चचे सेक्रेटरी जॉन्सन शेक्सपियर यांनी चर्चच्या सभासदांना शुभेच्छा दिलया व मार्गदर्शन केले.या प्रसंगी आमदार संग्रामभैय्या जगताप चर्च मध्ये उपस्थित होते.त्यांचा धर्मगुरु व चर्चचे सेक्रेटरी जॉन्सन शेक्सपियर यांनी पुष्पगुच्छ देवून सत्कार केला.सदरची भक्ती यशस्वी करण्यासाठी कमिटीचे सदस्य एन.बी. जाधव,महेंद्र भोसले,संतोष जाधव,राजेश चाबुकस्वार, मा.वसंत कांबळे,मिलींद भिंगारदिवे,प्रॅक्लिन शेक्सपियर,ऑलिवन शेक्सपियर,शामराव भिंगारदिवे,सचिन जाधव,संदिप पारधे,सॅम्युएल तिजोरे, विजय अंधारे यांनी प्रयत्न केले.

You cannot copy content of this page