अहमदनगर प्रतिनिधी (दि.२५ डिसेंबर):-श्रीरामपूर नगर परिषदेने प्रभाग क्र.११ मधील अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधारणा अंतर्गत गहिवार ते सय्यद यांच्या घरापर्यंत पेविंग ब्लॉक बसवण्याचे काम ठेकेदार याने १३ एप्रिल २०२२ रोजी रु.४८७३०१ चे काम हे बराच कालावधी उलटून जाऊनही सुरू झाले नसून त्यामुळे १२ ऑगस्ट २०२२ रोजी माहिती अधिकार अधिनियम मध्ये पेविंग ब्लॉक कामाची माहिती मागितली असता यामध्ये सदरचे काम गहिवार ते सय्यद यांच्या घरापर्यंत पेविंग ब्लॉक बसवणे याबाबतचे असून या कामाची बिल ठेकेदारास अदा केल्या बाबत कागदपत्रे उपलब्ध झाली.त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे काम झालेले नव्हते त्यामुळे नगरपरिषदेत जाऊन याबाबत चौकशी केली असता उडवा उडवीची उत्तरे देण्यात आली. नगरपरिषदेने अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधारणा अंतर्गत गहिवार ते सय्यद यांच्या घरापर्यंत मंजूर झालेल्या पेविंग ब्लॉगचा निधी हा दुसऱ्या छोट्या रस्त्यासाठी वापरला व ते काम पूर्ण करून ठेकेदार याला बिल अदा केलेले आहे.या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात सावळा गोंधळ झाल्याचे निदर्शनास आल्याने २१ नोव्हेंबर २०२२ रोजी नगरपरिषदेस पत्र देऊन २८ नोव्हेंबर २०२२ रोजी घंटानात आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला तरी नगरपरिषदेने यावर कुठलीही कारवाई न केल्याने घंटानाद आंदोलन केले.त्यावेळी मुख्याधिकारी यांनी कारवाई करीत असल्याने व उर्वरित काम लवकरच पूर्ण करत असून याबाबत ठेकेदारास १५ डिसेंबर २०२२ पर्यंत सर्व काम पूर्ण करून देण्याबाबत कळविले आहे.असे आश्वासन दिले परंतु त्यानंतरही याबाबत कुठलीही हालचाल दिसून आली नसून १५ डिसेंबर २०२२ रोजी सदर ठिकाणी जाऊन पाहणी केली असता जैसे थे परिस्थिती होती कामात कुठलीही प्रगती झालेली आढळून आली नाही याचाच अर्थ मुख्याधिकारी हे संबंधित अधिकारी तसेच ठेकेदार यांना पाठीशी घालण्याचे काम करीत असून या प्रकरणात मुख्याधिकारी हे देखील दोशी आहेत तरी या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी असणारे मुख्याधिकारी नगर अभियंता यांना त्वरित सेवेतून निलंबित करण्यात यावे व ठेकेदार यांच्यावरही फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जरीया फाउंडेशनच्या वतीने घंटानाद आंदोलन करण्यात आले होते.यावेळी जिल्हाधिकारी यांनी पत्र पाठवून पत्रात नमूद केले आहे की श्रीरामपूर नगरपरिषद हद्दीतील प्रभाग क्र.११ मधील अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधारणा अंतर्गत झालेल्या गहिवार ते सय्यद यांच्या घरापर्यंत पिविंग ब्लॉक बसवण्याच्या कामांमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराच्या तक्रारी अर्जातील मुद्द्यावर तसेच सदर प्राप्त तक्रारीवरून मुख्याधिकारी श्रीरामपूर नगरपरिषद यांनी २२ डिसेंबर २२ रोजी पाठवलेल्या अहवालाची सखोल चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली असल्याचे पत्राद्वारे कळविले असल्याची माहिती फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष जावेद शेख,उपाध्यक्ष इमरान शेख, खजिनदार संजय हिवराळे, सेक्रेटरी सद्दाम कुरेशी, कार्यअध्यक्ष शाहरुख कुरेशी, महेफुज खान यांना कळवले आहे.
Trending Topics:
Trending
- प्रभाग 10 मध्ये सविताताई घोडतुरेंची धडाकेबाज एन्ट्री..! विकासाची नवी दिशा..राजकारणाच्या समीकरणात खळबळ!
- निलंबित DYSP असल्याचे खोटे नाटक..! दोन पोलिस शिपायांना ४० लाखांना गंडा अहिल्यानगर मध्ये धक्कादायक प्रकार..!
- मोहटादेवी संस्थानच्या नवीन विश्वस्त मंडळाची घोषणा..! हे असतील विश्वस्त
- अंबरनाथ प्रभाग २५ मध्ये ‘सेवेच्या’ बळावर नवा दमदार चेहरा..स्वप्नाली शिंदे यांची निवडणुकीच्या रिंगणात धमाकेदार एन्ट्री..!
- प्रभाग ७ ला मिळणार विकासाचा नवा ध्यास..सामाजिक कार्यकर्ते संजय ठोंबरे यांची नगरसेवकपदासाठी दमदार दावेदारी..!
- अपंग महिलेशी एसटी कंडक्टरची आरेरावी..सामाजिक कार्यकर्त्या संध्याताई भगत संतप्त..!जबाबदार कर्मचाऱ्यावर निलंबनासह कठोर कारवाई करण्याची मागणी
- अहिल्यानगरची विकासदौड सुरु..! सुशोभीकरण मोहीम झंझावाती वेगात..शहराचा चेहरा मोहरा बदलणारच..आमदार संग्राम जगताप यांचे व्हिजन ठरतेय गेमचेंजर
- “जनतेच्या हक्काची नवी दिशा; प्रभाग १६ मधून जयश्रीताई टकले निवडणुकीच्या मैदानात!”
