न्यू गॉस्पल चर्चमध्ये अनाथ अपंग निराधार लोकांना नाताळनिमित्त ब्लॅंकेट व कपडे वाटप
नगर प्रतिनिधी (दि.२५. डिसेंबर):-भिंगार येथील सैनिक नगर मधील न्यू सुवार्ता तारण मंडळी व न्यू गॉस्पल चर्चमध्ये दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गोरगरीब दिन दलित अनाथ अपंग निराधार या लोकांसाठी ब्लॅंकेट,कपडे व साड्यांचे वाटप करण्यात आले.व या लोकांना तसेच परिसरातील नागरिकांना चर्चच्या वतीने भोजन देण्यात आले.यावेळी युवानेते महेश झोडगे,मराठा मिशनच्या अध्यक्षा डॉ.विजया जाधव,रेव्हरंट विजय पंडित,विकास पंडित,विशाल पंडित,नितीन गवारे, सामाजिक कार्यकर्ते लोकेश मेहतानी,माजी सरपंच विजय खोमणे,अरुणा कांबळे व चर्चचे सभासद व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.यावेळी बोलताना रेव्हेरेंट विजय पंडित म्हणाले की येशू ख्रिस्ताचा जन्म हा मानव जातीच्या कल्याणासाठीच झाला आहे,तसेच प्रभू येशू ख्रिस्ताने प्रत्येक मानव जातीला शांतीचा संदेश दिला त्या शांतीच्या संदेशाप्रमाणे गोरगरीब दिन दलितांनमध्ये आजचा जो कार्यक्रम होतोय व अंध अपंगाची काळजी जो घेतो,ख्रिस्तांची काळजी घेतो त्याच समाजकार्याचा न्यू गॉस्पल चर्चमध्ये ख्रिस्तांच्या पावलावर पाऊल टाकून चालण्याचा प्रयत्न होत आहे.त्यातूनच आजच्या या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे रेव्हरंट विजय पंडित यांनी यावेळी आवर्जून सांगितले.