अवैध शस्त्रे बाळगणाऱ्या इसमास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ठोकल्या बेड्या
अहमदनगर (दि.२६ नोव्हेंबर):-श्रीगोंदा तालुक्यातील उख्खलगांव या ठिकाणी अवैध शस्त्रे बाळगणाऱ्या इसमास जेरबंद करून त्याच्या ताब्यातून 03 तलवारी जप्त करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे.
बातमीची हकिगत अशी की,जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी पोनि/श्री.दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा यांना अहमदनगर जिल्ह्यामधील अवैध शस्त्रे बाळगणा-या इसमांची माहिती घेवुन कारवाई करणे बाबत दिले होते.नमुद आदेशान्वये पोनि/श्री.दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अंमलदारांचे पथक तयार करुन अहमदनगर जिल्ह्यामध्ये अवैध शस्त्रे व हत्यारे बाळगणा-या आरोपींची माहिती घेवुन कारवाई करणे बाबत सुचना देवुन पथकास रवाना केले.
स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस पथक हे अवैध शस्त्रे बाळगणारे इसमांची माहिती घेत असतांना दि.25 नोव्हेंबर रोजी पोनि/श्री. दिनेश आहेर यांना गुप्तबातमीदारा मार्फत उख्खलगांव,ता.श्रीगोंदा या ठिकाणी इसम नामे नामदेव चंदन (रा.उख्खलगांव,ता. श्रीगोंदा) याने त्याचे चिकन शॉप मध्ये विनापरवाना बेकायदा तलवारी लपुन ठेवलेल्या असल्याची माहिती प्राप्त झाल्याने पोनि/श्री. दिनेश आहेर यांनी प्राप्त माहिती पथकास कळवुन खात्री करुन कारवाई करणे बाबत सुचना दिल्या.पथकाने लागलीच उख्खलगांव ता. श्रीगोंदा या ठिकाणी जावुन बातमीतील इसमाचे चिकन शॉपची माहिती काढुन दुकानामध्ये असलेल्या इसमास ताब्यात घेण्यात आले.ताब्यात घेतलेल्या इसमास त्याचे नांव गांव विचारता त्याने त्याचे नांव नामदेव रावसाहेब चंदन रा. उख्खलगांव,ता.श्रीगोंदा असे असल्याचे सांगितले.त्याचे दुकानाची दोन पंचा समक्षझडती घेता त्यांचे दुकानामध्ये 3000/- रुपये किमतीच्या 3 धारदार तलवारी मिळुन आल्याने सदर मिळुन आलेल्या तलवारी जप्त करुन सदर इसमा विरुध्द पोकॉ/2383 रविंद्र तुकाराम घुंगासे नेम -स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन बेलवंडी पोलीस ठाणे गु.र.नं. 569/2023 भारतीय हत्यार कायदा कलम 4/25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास बेलवंडी पोलीस स्टेशन करीत आहे.
हि कारवाई श्री. राकेश ओला पोलीस अधीक्षक,श्री.प्रशांत खैरे अपर पोलीस अधिक्षक व उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.विवेकानंद वाखारे कर्जत विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोहेकॉ/बबन मखरे,पोना/संतोष खैरे,पोकॉ/रविंद्र घुंगासे,मच्छिंद्र बर्डे,रोहित मिसाळ यांनी केलेली आहे.