
अहमदनगर (दि.२७ नोव्हेंबर):-नेवासा तालुक्यातील देवगड फाटा या ठिकाणी रात्रीचे वेळी जबरी चोरी करणारी टोळी जेरबंद करण्यास स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे.

बातमीची हकिगत अशी की,दि.19 नोव्हेंबर रोजी फिर्यादी अजित सिद्राम गुळवे (रा.शिंगोणी,ता.माळशिरस, जि.सोलापुर) हे त्यांचे कडील पिकअप गाडीसह सोलापुर या ठिकाणी जात असतांना त्यांना रस्त्यामध्ये झोप लागल्याने त्यांनी त्यांचे कडील पिकअप गाडी छत्रपती संभाजीनगर ते अहमदनगर रोडवरील देवगड फाटा,ता. नेवासा या ठिकाणी रोडचे कडेला लावुन गाडीमध्ये झोपले असता अज्ञात 3 आरोपींनी येवुन त्यांना शिवीगाळ करुन जिवे मारण्याची धमकी दिली व त्यांचे कडील तसेच गाडीमधील क्लिनर यांचे कडील मोबाईल रोख रक्कम असा 73,000/- रुपये किमतीचा मुद्देमाल बळजबरीने चोरुन नेला होता.
या बाबत फिर्यादी यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन नेवासा पोलीस ठाणे गु.र.नं. 1080/2023 भादवि कलम 392,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.ही घटना गंभीर स्वरुपाची असल्याने जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी पोनि/श्री.दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा यांना स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे पथक नेमुन सदर गुन्हा उघडकिस आणणे बाबत सुचना दिल्या होत्या.
नमुद आदेशान्वये पोनि/श्री. दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे पथक नेमुन गुन्ह्याचा तपास करुन गुन्हा उघडकिस आणणे बाबत आवश्यक सुचना देवुन पथकास रवाना केले. पथकाने लागलीच घटना ठिकाणास भेट देवुन घटनाठिकाणचे आजुबाजुचे सी.सी.टी.व्ही. फुटेजची पाहणी करुन तसेच अशा प्रकारे गुन्हे करणारे आरोपी, जेलरिलीज आरोपींची माहिती घेत असतांना तांत्रिक विश्लेषणाचे आधारे तसेच गुप्त बातमीदारामार्फत सदरचा गुन्हा हा शाहरुख सत्तार खान (रा.पानीवीस कॉलनी,ता.जि.जालना) याने व त्याचे इतर दोन साथीदारांनी केला असल्याची माहिती मिळाल्याने शाहरुख सत्तार खान यास जालना या ठिकाणावरुन ताब्यात घेवुन त्यास विश्वासात घेवुन विचारपुस करता त्याने त्याचे साथीदारासह गुन्हा केल्याची कबुली दिल्याने 1)शाहरुख सत्तार खान रा.पानीविस कॉलनी,ता.जि.जालना, 2) दिपक लक्ष्मण भुसारी (रा. गोकुळवाडी,ता.जि.जालना) यांना जालना या ठिकाणावरुन व आरोपी नामे 3)ओंकार उर्फ मंथन प्रफुल्ल ताठीया (रा.वडगांव बु,ता.जि. पुणे) यास वडगांव बु या ठिकाणावरुन ताब्यात घेण्यात आले.त्यांचे कडुन 54,500/- रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींना नेवासा पोलीस स्टेशन येथे हजर केले आहे. पुढील तपास नेवासा पो.स्टे. करीत आहे.हि कारवाई श्री. राकेश ओला साहेब पोलीस अधीक्षक,श्रीमती.स्वाती भोर मॅडम अपर पोलीस अधिक्षक श्रीरामपुर व उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.सुनिल पाटील शेवगांव विभाग यांचे सुचना व मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोउपनि/तुषार धाकराव, पोहेकॉ/दत्तात्रय गव्हाणे, पोना/रविंद्र कर्डीले,संदीप दरंदले,ज्ञानेश्वर शिंदे,फुरकान शेख,संतोष खैरे,किशोर शिरसाठ,प्रशांत राठोड, चापोहेकॉ/संभाजी कोतकर यांनी केलेली आहे.