
अहमदनगर (दि.२७ नोव्हेंबर):-बहुजन शिक्षण संघांचे भिमा गौतमी विद्यार्थिनी आश्रम येथे २६ नोव्हेंबर संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

यावेळी विद्यार्थिनीनी संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन केले,या प्रसंगी प्रमुख पाहुणे योगेश साठे वंचित बहुजन आघाडी जिल्हा महासचिव यांनी मनोगत व्यक्त केले.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे कार्यकारी रजिस्ट्रार संदीप सदाफुले सर,प्राचार्य शेख सर यांनी संविधान दिनानिमित्त उपस्थित मान्यवरांच्या हस्ते खाऊ वाटप करण्यात आले.
या प्रसंगी विदयालय व ज्यु.कॉलेज चे संजीवन साळवे सर यांनी प्रास्ताविक केले व आभार नियोजन अजय भिंगारदिवे सर यांनी केले.या प्रसंगी अधिक्षिका रजनी घोडेराव मॅडम,महेंद्र कदम सर,भीमराव जाधव सर खोसे मॅडम,झाडे मॅडम,साठे मॅडम व विद्यार्थिनी समूह उपस्थित होते.