
अहमदनगर (दि.२७ नोव्हेंबर):-अहमदनगर जिल्ह्यात २७,२८,२९ नोव्हेंबर रोजी विजांच्या कडकडाटांसह वादळी वारा व अतीवृष्टी होण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे.

सर्व नागरिकांनी योग्य ती दक्षता घ्यावी असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांनी केली आहे.
