
येवला प्रतिनिधी (दि.२८ नोव्हेंबर):-यावर्षीच्या दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी आधीच हवालदिल झालेला होता.
त्यात दुष्काळात तेरावा महिना अशी अवस्था अवकाळी गारपीट व पावसामुळे शेतकऱ्यांची झाली आहे.या पावसामुळे द्राक्ष,कांदा,भाजीपाला अश्या विविध पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.अश्या भयानक परिस्थितीत सरकार म्हणून शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे सरकारचे कर्तव्य आहे.
म्हणून प्रशासनाने त्वरित पंचनामे करून भरीव मदत लगेच शेतकऱ्यांना करावी.तसेच अजून कांदा अनुदान मिळाले नाही,त्यात दुष्काळाची मदत जाहीर नाही त्यासाठी प्रशासकीय प्रक्रिया नाही,म्हणून शेतकऱ्यांना पुन्हा उभं करण्यासाठी इतर सर्व कामे बाजूला ठेऊन वरील मदत त्वरित शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी
अन्यथा तीव्र आंदोलन सुरू करण्यात येईल असा इशारा सरकारला सचिन आहेर संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती येवला यांनी दिला आहे.