
पाथर्डी प्रतिनिधी(दि.२९ नोव्हेंबर):-पाथर्डी तालुक्यातील वैजू बाभूळगाव येथे एक अज्ञात व्यक्तीने धुडगूस घातला आहे हा गावात तसेच डोंगराच्या कडेला फिरत आहे.
या व्यक्तीने गावातील काही महिलांची छेड काढली असून या व्यक्तीच्या हातात लोखंडी कुऱ्हाड व रॉड असून या व्यक्तीमुळे गावातील व तसेच वस्तीवरील रहिवासी अत्यंत भयभीत झाले असून तरी या व्यक्तीपासून महिला व पुरुषांना धोका निर्माण झाला आहे.या अज्ञात व्यक्तीचा लवकरात लवकर बंदोबस्त करण्यात यावा,
अशी मागणी वैजू बाबुळगावच्या सरपंच सौ. ज्योतीताई घोरपडे व उपसरपंच श्री.रावसाहेब लोहकरे यांनी पाथर्डी पोलीस निरीक्षक यांच्याकडे दि.२९ नोव्हेंबर रोजी निवेदनाद्वारे केली आहे.