
अहमदनगर (दि.२९ नोव्हेंबर):-अहमदनगर महानगरपालिकेच्या वतीने शहरातील सर्व रहिवासी व्यावसायिक व इतर सर्व मालमत्ता धारकांना नम्र आवाहन करण्यात येते की,

अहमदनगर महानगरपालिके तर्फे दि.९ डिसेंबर २०२३ रोजीच्या लोक अदालती करिता मालमत्ता विषयक प्रकरणे ठेवण्याचे नियोजन केलेले आहे.सर्व पदाधिकाऱ्यांची निवेदने विचारात घेऊन शहरातील गरीब,कमी उत्पन्न गटातील मालमत्ता धारकांकरिता शास्तीमध्ये 75 टक्के माफी देण्याचा निर्णय अहमदनगर महानगरपालिका आयुक्त यांनी घेतलेला आहे.
तरी शहरातील मालमत्ता धारकांना विनंती करण्यात येते की, आपण आजपासून दि.९ डिसेंबर २०२३ पर्यंत मालमत्ता करामध्ये ठेवण्यात आलेल्या शास्ती माफीचा लाभ घ्यावा व आपला कर या वेळेमध्ये भरावा व होनारी कारवाई टाळावी.