
अहमदनगर (दि.२८ नोव्हेंबर):- तालुक्यातील खांडके ग्रामपंचायत मधील सरपंच पोपट सोन्याबापू चेमटे यांचे सरपंचपद विभागीय आयुक्त नाशिक कार्यालयाने ग्रामपंचायत कायदा कलम (३९) १ प्रमाणे दि.३/११/२०२३ रोजी अपात्र केले होते.
परंतु या निर्णयाला सरपंच पोपट सोन्याबापु चेमटे यांनी आव्हान देत मुंबई ग्राम विकास मंत्रालयात दि.९/११/२०२३ रोजी अपील दाखल केले होते.अद्याप त्याचा निकालही झाला नाही.परंतु या अपीलाची सुनावणी प्रलंबित असताना निवडणूक आयोग अधिकारी तथा अभ्यासी अधिकारी खांडके ग्रामपंचायत यांनी दि.२९ नोव्हेंबर २०२३ सरपंच पदाची निवडणूक कार्यक्रम राबविण्यासाठी ग्रामपंचायत खांडके येथे मीटिंग बोलवली होती.या नोटीसला आव्हान देत याचिका करते यांनी उच्च न्यायालय खंडपीठ संभाजीनगर येथे रिट याचिका दाखल केली.
या याचिकेवरती आज दि.२८ नोव्हेंबर २०२३ रोजी सुनावणी होऊन मा.उच्च न्यायालयानी सरपंच पोपट सोन्याबापू चेमटे यांच्या अपील अर्जावरती दि.८/१२/२०२३ पर्यंत मंत्री महोदयांनी कारवाई करण्याचे निर्देशित केले आहे व सदरच्या निर्णयावरती अधीन राहून सरपंच पदाच्या निवडी संदर्भात निर्णय घ्यावा असे आदेशित केले आहे.
त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी तथा अभ्यासी अधिकारी यांना ८ डिसेंबर २०२३ पर्यंत स्टे एप्लिकेशन वरती काय निर्णय होतो याची वाट पाहावी लागनार आहे व ९ डिसेंबर २०२३ नव्याने सरपंच पदाची निवडणूक प्रक्रिया राबविण्या संदर्भात निर्णय घ्यावा लागेल.यावेळी अपिलार्थी सरपंच पोपट चेमटे यांच्या वतीने ॲड.नरेंद्र पाटेकर यांनी काम पाहिले तर त्यांना ॲड.सचिन घावटे यांनी सहकार्य केले.