Maharashtra247

नगर शहर सहकारी बँक फसवणूक प्रकरणी चार्टर्ड अकाऊंटंट विजय मर्दाच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने दापोलीतून आवळल्या मुसक्या 

अहमदनगर (दि.१४ डिसेंबर):-नगर जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेली शहर सहकारी बँकेच्या कर्ज फसवणूक प्रकरणात नगर शहरातील चार्टर्ड अकाऊंटंट विजय मर्दा याला आर्थिक गुन्हे शाखेने दापोली जवळून ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

बुधवारी (ता.१३ डिसेंबर ) सायंकाळी दापोली येथून पळून जाण्याच्या तयारीत असताना त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.

दरम्यान,चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले.याबाबत अधिकृत माहिती अद्याप देण्यात आलेली नाही. दरम्यान,ताब्यात घेतल्याच्या वृत्ताला पोलीस अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला.एका मोठ्या कर्ज प्रकरणात फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू आहे.

You cannot copy content of this page