अहमदनगर (दि.१४ डिसेंबर):-हिंदी चित्रपट सृष्टीतील अभिनेता बॉलीवूडचा किंग शाहरुख खान व सुहाना खान यांनी शिर्डी येथे साईबाबांचे दर्शन घेतले आहे.शाहरुख खान याचा आगामी चित्रपट डंकी या हिंदी चित्रपटाच्या यशासाठी शाहरुख खान हा साई दरबारी आला असून त्याला पाहण्यासाठी त्याच्या चाहत्यांनी मंदिर परिसरामध्ये एकच गर्दी केली होती.
शाहरुख खान याने यावर्षी पठाण आणि जवान या दोन ब्लॉकबस्टर हिंदी चित्रपट केले आहे आणि त्यातच आता शाहरुख खान याचा नव्याने डंकी हा चित्रपट येत आहे. याच डंकी चित्रपटाचे यशासाठी शाहरुख खान व सुहाना खानने साई दरबारी आले होते.शाहरुख खान याचा डंकी हा चित्रपट 21 डिसेंबर 2023 रोजी भारतातील प्रत्येक सिनेमागृहामध्ये प्रदर्शित होणार आहे दरम्यान डंकी या चित्रपटाचा ट्रेलर देखील रिलीज झाला आहे.
डंकी हा चित्रपट ब्लॉकबस्टर व्हावा यासाठी शाहरुख खान हे मागील दोन दिवसांपूर्वी वैष्णवदेवी मंदिरात देखील जाऊन आले होते आणि आज शाहरुख खान व सहारा खान यांनी शिर्डी साईबाबा येथे हजीरी लावून साईबाबांचे दर्शन घेतले.यावेळी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.