बसमित्र अंतर्गत नागरिकांना चांगली सेवा देण्याची चालक व वाहकांना आम आदमी पक्षाच्या महिला कार्यकर्त्यांनी केली विनंती
पुणे प्रतिनिधी(१४ डिसेंबर):-पुणे जिल्ह्यातील आम आदमी पक्षातर्फे राबविलेल्या बसमित्र संकल्पने अंतर्गत पक्षाच्या महिला कार्यकर्त्यांनी बस चालकांना अधिक चांगली सेवा देण्याची विनंती करून तसेच बस चालकाकडून त्याचे पालन करण्याचे वचनही घेतले.
या महिला कार्यकर्त्यांनी पहिल्या टप्प्यात बसमित्र संकल्पने अंतर्गत शहरातील विविध बस थांब्यावर थांबून प्रवाशांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या तर दुसऱ्या टप्प्यात भाऊबीजेचे औचित्य साधत बस चालक व वाहक यांच्याकडून ओवाळणीच्या रूपाने वचन घेतले.यामुळे शहरातील वाहतुकीची समस्या कमी होण्यास मोठ्या प्रमाणात मदत होईल.
यावेळी आम आदमी पार्टीचे सिंथील अय्यर, सुरेखा भोसले,माधुरी गायकवाड,सामाजिक कार्यकर्त्या शितल कांडेलकर, मुमताज शेख,ॲनी अनिश, सुनिता काळे,प्रिया जाधव आदी पक्षाचे कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते.