हॉस्पिटलच्या आवारात तलवार घेऊन फिरणारा कोतवाली पोलिसांच्या ताब्यात
अहमदनगर (दि.१५ डिसेंबर):-नगर शहरातील कोठी परिसरातील एका हॉस्पिटलच्या आवारात एक इसम हातात तलवार घेऊन फिरत असल्याची गुप्त खबर पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव मिळाली होती त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक यादव यांनी कोतवाली पोलिसांना कारवाई करण्याच्या सूचना दिल्या.
त्यानुसार पोलिसांनी हॉस्पिटल परिसरात शोध घेतला असता तलवार घेऊन फिरणारा युवक आढळून आला नाही.त्यानंतर कोतवाली पोलिसांनी हॉस्पिटलच्या सिसिटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासले असता एक इसम हातात तलवार घेऊन फिरताना दिसला मात्र पोलिसांना खबर लागताच त्याने आपल्या हातातील तलवार हॉस्पिटलच्या गेटवर सोडून पळून गेला.
त्यानंतर गेटजवळ जाऊन पाहिले असता पोलिसांना त्या ठिकाणी एक पिवळ्या रंगाची त्याला केशरी रंगाची कडा असलेली म्यान व त्याच्या आतमध्ये टोकदार लोखंडी तलवार निदर्शनास आली.तलवार घेऊन फिरणाऱ्या इसमाचे नाव विचारले असता सीताराम श्रीराम खताळ वय-४८ (रा.सावेडी अहमदनगर) असे सांगण्यात आले.
तो इसम अपघातानंतर झालेल्या बाचाबाची नंतर वाद करण्यासाठी आला होता.कोतवाली पोलिसांनी सदरील तलवार जप्त केली.तलवार घेऊन फिरणाऱ्या इसमाचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोसई प्रवीण पाटील, स.फौ.तनवीर शेख,पो.हे कॉ.गणेश धोत्रे,पो. हे. कॉ. सलीम शेख, पो कॉ. अभय कदम, पो. कॉ.सुजय हिवाळे,पो. कॉ.अतुल काजळे पोलीस अंमलदार गणेश धोत्रे, योगेश भिंगारदिवे, अमोल गाढे, संदीप थोरात, कैलास शिरसाठ, सोमनाथ राऊत आदींनी केली आहे.