अहमदनगर (दि.१५ डिसेंबर):-अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा येथे राहणाऱ्या दोन पीडित मुलींच्या आईने श्रीगोंदा पोलीस ठाण्यात पीडित अल्पवयीन मुलींच्या वतीने दिलेल्या फिर्यादीनुसार
दि. 07 ऑगस्ट 2023 रोजी पासुन ते दिनांक 14 डिसेंबर 2023 रोजी दरम्यान तक्रारदार यांच्या मुली,दोघी वय 17 वर्ष,या श्रीगोंदा शहरातील नामांकित महाविद्यालयात इयत्ता 11 वी मध्ये विज्ञान शाखेत शिक्षण घेत असतांना व महाविद्यालयाचे मुलींचे वस्तीगृहातील रुममध्ये राहत असतांना त्यातील एकिस सोहेल रियाज जकाते, श्रीगोंदा, व दुसऱ्या एका अल्पवयीन मुलीस जिशान कलीम जकाते याने मुलगी ही अल्पवयीन असल्याचे माहीत असतांना देखील दोघांनी वेळोवेळी त्यांना धमकी देवुन नक्षत्र लॉजिंग श्रीगोंदा याठिकाणी जबरी अत्याचार केला.
तर,या प्रकरणी त्रयस्थ एका मुलीने मध्यस्ती करुन दोघींस फुस दिल्याने फिर्यादिने त्यांचे विरुद्ध दिलेल्या फिर्यादीवरुन श्रीगोंदा पोलीस स्टेशनमध्ये भा.द.वि.का.कलम 376, 376 (2)(J), बा.लै.अ.प्र.अधि. 4, 11,12, 17 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यातील आरोपी श्रीगोंदा पोलीसांनी ताब्यात घेतले असून,श्रीगोंदा शहरात चालु असलेल्या लॉजिंग मधील गैर प्रकारांबाबत स्थानिक पोलीस यंत्रणा सक्रिय झाली आहे. पुढील तपास पो.नि.ज्ञानदेव भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोसई/समीर अभंग करीत आहेत.