
अहमदनगर (दि.१५ डिसेंबर):-अहमदनगर महापालिकेने शहरातील जातीवाचक नावे असलेल्या ३७ ठिकाणांची नावे बदलली आहेत.शहरातील जातीवाचक ठिकाणांची नावे बदलण्याचा निर्णय १२ जुलै २०२३ रोजी घेण्यात आला होता.
त्यानुसार शहरातील ठिकाणांच्या नावांची शिफारस करण्यासाठी समिती गठीत केली होती.या समितीने नवी नावे दिली आहेत.त्यानुसार नगर शहरातील ३७ ठिकाणांची नावे बदलण्यात येत आहेत,असे नगर महापालिका प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.
अशी बदलण्यात आली नावे
*ब्राह्मण कारंजा ईदगाह मैदानाजवळ-शनी गल्ली कारंजा किंग्ज गेट
*ब्राह्मण गल्ली माळीवाडा– संत परशुराम गल्ली
*भिल्ल वस्ती सावेडी नाका– एकलव्य वसाहत सावेडी नाका
*वैदूवाडी सावेडी-शिंदे नगर सावेडी
*शिंपीगल्ली सहकार नगर– संत नामदेव गल्ली
*तेलीखुंट–संत संताजी महाराज पथ
*मोची गल्ली तोफखाना-संत शिरोमणी रवीदासजी नगर
*मोची गल्ली कापड बाजार– संत गुरू रोहिदास गल्ली कापड बाजार
*कुंभार गल्ली नालेगाव–संत गोरोबा काका गल्ली
*खाटिक गल्ली पंचपीर चावडी –डॉ.अब्दुल कलाम मोहल्ला
*हरिजन वस्ती सिद्धार्थनगर– रमाबाई आंबेडकर वस्ती सिद्धार्थ नगर
*बौद्धवस्ती सिद्धार्थ नगर–डॉ.बाबासाहेब आंबेडकर वस्ती
*माळीवाडा-लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नगर
*ढोरवस्ती भवानीनगर–आनंद नगर
*हरिजन वस्ती केडगाव– पंचशील नगर केडगाव
*गवळीवाडा सिव्हील हॉस्पिटल जवळ– बालब्रम्हचारी सदगुरू महादू अप्पा नगर
*माळीवाडा–महात्मा फुले नगरकसाई नगर जुने नगर तालुका पोलीस ठाण्याजवळ –व्यापारी मोहल्ला
*खाटिक गल्ली फुलसौंदर चौक माळीवाडा-शरिफ गल्ली
*वडारवस्ती केडगाव वेशी जवळ-बजरंग नगर
*काळी बागवान गल्ली– कालूभाई गल्ली
*ख्रिश्चन कॉलनी तारकपूर– तारकपूर असोसिएशन एफ २२ तारकपूर कॉलनीसिंधी कॉलनी तारकपूर-संत कंवरराम नगर
*वाणीनगर पाईपलाईन रस्ता –महाकाली नगर
*धनगर गल्ली लक्ष्मीबाई कारंजा जवळ-संत बाळू मामा गल्ली
*वंजार गल्ली-संत भगवान बाबा गल्ली
*पिंजार गल्ली–पीर शहा गल्ली
*ढोरवस्ती बालिकाश्रम शाळेजवळ-महालक्ष्मी वस्तीकुंभार गल्ली बागडपट्टी –संत गोरोबा गल्ली
*परदेशी गल्ली-महाराणा प्रताप गल्ली
*खिस्त गल्ली-संभवनाथ गल्ली
*मिसगर चाळ-सिव्हील हॉस्पिटल चाळ
*बुरूडगल्ली-बांबू गल्ली
*सिंधी कॉलनी भूतकरवाडी जवळ-संत झुलेलाल कॉलनी
*मराठा नगर केडगाव– छत्रपती संभाजी महाराज नगर गुजर गल्ली- स्वामी समर्थ मार्ग
*बोहरी चाळ स्टेशन रस्ता – रमाबाईनगर स्टेशन रस्ता