
अहमदनगर (दि.२८ डिसेंबर):-सावेडी उपनगरातील प्रसिद्ध कोचिंग क्लासच्या शिक्षकाने त्याच्या क्लासमध्ये शिकत असलेल्या शहरातील एका महाविद्यालयातील विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे.

ही घटना २७ डिसेंबर २०२३ रोजी घडली आहे.या बाबत पीडित अल्पवयीन मुलीने तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे,
की सत्यम नवनाथ कुटे याने माझा हात पकडून म्हणाला की मला तू खूप आवडतेस,मी तुला लाईक करतो,माझ्याबरोबर प्रेम संबंध ठेव पीडित मुलीने झालेला सर्व प्रकार आईला सांगितल्यावर पीडित मुलगी व तिची आईने तोफखाना पोलीस ठाणे गाठले व झालेली सर्व हकीकत सांगितली फिर्यादी मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून शिक्षक सत्यम नवनाथ कुटे याच्या विरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास सपोनि.जे.सी.मुजावर हे करीत आहे.