
अहमदनगर (दि.२८ डिसेंबर):-कत्तलीसाठी चालवलेल्या गोवंशीय जनावराची नगर तालुका पोलिसांनी केली सुटका,एक लाख ६० हजाराचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे.

गोवंशीय जनावरे कत्तलीसाठी गुलामसमदानी अब्दुल अलीम कुरेशी (रा.बेपारी मोहल्ला,झेंडीगेट,अहमदनगर) हा एका टेम्पो मधून घेऊन जात असल्याची गोपनीय माहिती नगर तालुका पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिशिर कुमार देशमुख यांना मिळाली होती.
त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक शिशिकुमार देशमुख यांनी तात्काळ पोलीस कर्मचाऱ्यांचे पथक केडगाव ते निमगाव वाघा दिशेने पाठवले. पथकातील कर्मचाऱ्यांनी निमगाव वाघा गावाच्या जवळच पोलीस पथकाने टेम्पो चालकास थांबण्यास सांगितले.पोलीस कर्मचाऱ्यांनी टेम्पोची तपासणी केली असता टेम्पो पाठीमागच्या केबिनमध्ये गोवंशीय जनावरे होती दरम्यान त्याला पथकातील कर्मचाऱ्यांनी विचारले असता त्याने प्रथम उडवा उडवीचे उत्तरे दिली त्याला अधिक विश्वासामध्ये घेऊन विचारले असता त्याने सांगितले की कत्तलीसाठी घेऊन चालल्याची कबुली दिली.
त्यानुसार नगर तालुका पोलीस स्टेशनचे पोकॉ/बाळु मच्छिंद्र चव्हाण तालुका यांनी दिलेल्या फिर्यादीवरून (i) अधिनियमः- महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा कलम सन 2014 चे सुधारीत 2015 चे कलम 5(अ), 9 (अ) सह प्राण्यांना कृतेने वागण्यास प्रतिबंध करण्याबाबतचा अधिनियम 1960 चे कलम 11 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हि कारवाई जिल्हा पोलीस निरीक्षक राकेश ओला,अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, ग्रामीणचे उपविभागीय पोलीस अधिकारी संपतराव भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शिशिकुमार देशमुख,पोलीस उपनिरीक्षक युवराज चव्हाण, चालक सहाय्यक फौजदार दिनकर घोरपडे,पोलीस हेडकॉन्स्टेबल जगदीश जम्बे, पोलीस अमलदार मंगेश खरमाळे,बाळू चव्हाण,विक्रांत भालसिंग,संभाजी बोराडे, कमलेश पाथरूट,विशाल टकले यांनी केली आहे.