
श्रीगोंदा प्रतिनिधी (दि.२८ डिसेंबर):-श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी पोलिसांनी गव्हाणवाडी येथील दोन वेश्या व्यवसाय करणाऱ्या लॉज वर छापा टाकत एका परप्रांतीय महिलेसह पाच महिलांची सुटका केली आहे.

बातमीची हकीकत आशिकी,दि.27 डिसेंबर 2023 रोजी बेलवंडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना गोपनीय माहिती मिळाली की ,बेलवंडी पोलीस स्टेशन हद्दीतील नगर पुणे रोडवर गव्हाणवाडी येथे सोनल गार्डन लॉज येथे आरोपी-बालाजी चंदन नरहरी (रा.चादुरेवाडी हल्ली राहणार गव्हाणवाडी ता.श्रीगोंदा जि.अहमदनगर) व अमृत लॉज येथे आरोपी रामलखन भैय्यालाल वर्मा (रा.वार्ड नं.13 मेमरी खुर्द पो.रघुराजगढ ता.मनगवा जि. गवा राज्य-मध्यप्रदेश हल्ली राहणार गव्हाणवाडी ता. श्रीगोंदा जि.अहमदनगर) हे स्वतःच्या फायद्या करता वेगवेगळ्या मुली/ महिलांकडून वेश्याव्यवसाय करवून घेत आहे.
या माहितीची शहानिशा करून छापा टाकण्याकरिता पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी शासकीय पंच बोलावून तसेच कर्जत उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी विवेकानंद वाखारे साहेब यांना या बाबत माहिती देऊन त्यांचे उपस्थितीत बेलवंडी पोलीस स्टेशनचे कर्मचारी यांचे दोन पथक तयार करून प्राप्त माहितीनुसार पंचासोबत डमी गिऱ्हाईक पाठवून छापा टाकून कारवाई केली असता यातील आरोपी-1)बालाजी चंदन नरहरी हा सोनंल गार्डन लॉज येथे तीन महिलांच्या साह्याने वेश्या व्यवसाय करत असताना मिळून आल्याने त्यास पंचा समक्ष रंगेहात पकडले.
तसेच आरोपी रामलखन भैय्यालाल वर्मा हा अमृत लॉज येथे तीन महिलांच्या साह्याने वेश्याव्यवसाय करताना मिळून आल्याने कारवाई करण्यात आली.एकूण सहा पीडित महिलांची सुटका करुन दोन स्वतंत्र गुन्हे PITA ACT कलम 4,5 प्रमाणे दाखल करून दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली.
हि कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.राकेश ओला,अप्पर पोलीस अधीक्षक श्री.प्रशांत खैरे,उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.विवेकानंद वाखारे यांच्या मार्गदर्शनाखाली बेलवंडी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे,पोलीस उपनिरीक्षक/ गाजरे,पोहेकॉ/नंदकुमार पठारे,भाउसाहेब यमगर,लेखनिक कैलास शिपनकर, विनोद पवार,सतिष शिंदे,संदिप दिवटे,रवी जाधव,विकास सोनवणे,मपोना/सुरेखा वलवे,अविंदा जाधव,यमुना बजंगे,पोलीस उपनिरीक्षक चाटे,सफौ/शिंदे,सफौ/मारुती कोळपे,पोहवा/झुंजार,हसन शेख,खेडकर,भाऊ शिंदे, जायकर,पोना/गांगर्डे,जावेद शेख,पोकॉ/इरफान शेख,संजय गुंड,भांडवलकर,मपोशि/विद्या धावडे,अश्विनी शिंदे,मपोना/काळे यांनी केली आहे.