Maharashtra247

गुलमोहर रोडवरील पारिजात चौक येथे परप्रांतीय ठेकेदाराचा भोसकून खून

अहमदनगर (दि.२९ डिसेंबर):-सावेडी उपनगरातील पारिजात चौकातील तांबटकर मळ्यामध्ये आगाऊ घेतलेले पैसे देण्याच्या वादातून कमलेश प्रेमकुमार कुशवह या परप्रांतीय व्यक्तीचा खून केल्याची घटना उघडकीस आली.

या संदर्भात मिठाना कमलेश कुशवह यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बिंदाप्रसाद कालीदिन रावत याच्या विरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात कलम 302,504 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मयताच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की २८/१२/२०२३ रोजी १०.३० वाजे सुमा तांबटकर मळा, परीजात चौक गुलमोर रोड अहमदनगर येथे मी राहत असलेले घरात माझा भाऊ नामे राजु याचे सोबत फोनवर बोलत असताना बिंदाप्रसाद कालीदीन रावत हा तेथे येवुन मोठ्याने बोलु लागला म्हणुन त्यास माझे पती कमलेश हे त्यास मोठ्याने बोलु नको असे म्हणाले तसेच आमचे आगावु घेतलेले पैसे दे असे म्हणाल्याचा राग आल्याने बिंदाप्रसाद कालीदीन रावत याने माझे पती नामे कमलेश प्रेमकुमार कुशावह यांना चाकुने छातीवर मारहाण करुन जखमी करुन त्यास जिवे ठार मारले असल्याची फिर्याद पोलीस ठाण्यात देण्यात आली.अधिक तपास पोलिस करत आहेत.

You cannot copy content of this page