अहमदनगर (दि.२९ डिसेंबर):-गोवंशीय जनावरांना डांबून ठेवत त्यांची कत्तल केल्याप्रकरणी सहा जणांना ताब्यात घेत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या कारवाईत एकूण ५ लाख ६० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.गुप्त बातमीदाराकडून कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांना शहरातील झेंडीगेट परिसरात काही गोवंशीय जनावरांना डांबुन ठेवुन त्यांची कत्तल केली जात आहे अशी माहिती मिळाली होती.
त्या अनुषंगाने यादव यांनी गुन्हे शोध पथकाच्या कर्मचाऱ्यांना खात्री करुन छापा टाकून कारवाई करण्याचे आदेश दिले.पथकाने तात्काळ कारी मस्जिदजवळ सार्वजणीक स्वछता ग्रहाजवळ झेंडीगेट येथे शोध घेतला असता एका बंद दरवाजा असलेल्या घरातुन काही तरी तोडल्याचा आवाज आल्याने पाहणी केली, तर त्या खोलीमध्ये गोवंशीय जनावरांची कत्तल केलेले अंदाजे २००० किलो गोमांस दिसुन आले.
त्याचं परीसरात आणखी शोध घेतला असता शाळा क्रं ४ जवळ मागील बाजुस अंधारात एकुण ८ गोवंशीय जणावरे आढळून आली. असा एकुण ५ लाख ६० हजार किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.सदर ठिकाणी कत्तल कारणारे फैसल अस्लम शेख (वय १९) रा.झेंडीगेट नौषाद बेकरी, राशीद इलीयास कुरेशी (वय २२) रा. नालबंद खुंट बक्कर कसाब मस्जीद, औवेस राशीद शेख (वय २४) रा. आंबेडकर चौक इ पेंडीगेट, रहेमुद्दीन महेबुब करेशी (वय २६) रा. बाबा बंगाली जवळ झेंडीगेट, मुसाविर युनुस कुरेशी (वय २१) रा.बाबा बंगालीजवळ झेंडीगेट, मोहमीद नजिर एहमद कुरेशी (वय २३) रा.आंबेडकर चौक जुणे तालुका पोलीस स्टेशन अ नगर आदींना ताब्यात घेऊन त्यांच्यावर भा.द.वि.कलम २६९ महाराष्ट्र प्राणी रक्षा अधिनियम सन १९९५ चे सुधारीत सन २०१५ चे कलम ५ (क) ९ (अ) सह प्राणी क्लेष प्रतिबंध अधिनियम सन १९६० चे कलम ११ प्रमाणे पो.कों.अमोल दिलीप गाढे यांचे फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई ही पोलीस अधिक्षक राकेश ओला,अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकाडे, यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पो.हे. कॉ. तनवीर शेख, पो.हे.कॉ.गणेश धोत्रे, पो.हे.कॉ.योगेश भिंगारदिवे, पो. कॉ.संदिप थोरात, पो.कॉ.सोमनाथ राऊत, पो.कॉ. अमोल गाढे, पो.हे.कॉ.इनामदार, पो.कॉ. सुजय हिवाळे, पो.ना. सलिम शेख, पो.कॉ.अतुल काजळे, पो.कॉ.अभय कदम, यांच्या पथकाने केली आहे.