अहमदनगर (दि.३ जानेवारी):-पाय घसरुन पडून मृत्यूचा बनाव उघड,पतीच्या डोक्यात रॉड मारुन खुन करण्याऱ्या आरोपी पत्नीस श्रीरामपूर शहर पोलीसांनी तात्काळ अटक केली आहे.
बातमीची हकीकत अशी की,दि. 01 जानेवारी 2024 रोजी पहाटे 05/45 वा. सुमारास यातील मयत इसम संजय गवुजी भोसले, (रा.अतिथी कॉलनी,वार्ड नं.01,श्रीरामपूर) हा त्याच्या राहत्या घराच्या पायरीवरुन पाय घसरुन पडल्याने त्यांच्या डोक्यास मार लागुन मृत्यू झाला वगैरेच्या माहितीवरुन आ.मू.नं. 01/2024 सी.आर.पी.सी.कलम 174 प्रमाणे दाखल करण्यात आला होता.
मयत इसमाच्या मृत्यूबाबत पोलीस पथकास संशय आल्याने पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करुन, मयताच्या डोक्यास झालेल्या जखमाबाबत डॉक्टारांनकडुन माहिती घेतली असता सदरच्या जखमा पायरीवरुन पाय घसरुन पडुन झालेल्या नसुन त्या शस्त्राने झाल्याचे सांगितल्याने मयताची पत्नी हिला मयताचा अत्यंविधी कार्यक्रम झाल्यानंतर तात्काळ ताब्यात घेवुन पोलीस स्टेशन येथे आणुन तिच्याकडे तपास केला असता तिने सुरुवातील उडवाउडवीची उत्तरे दिली परंतु तिला अधिक विश्वासात घेवुन तिच्याकडे सखोल तपास केला असता तिने सांगितले की,माझे पती हे मला दारु पिवुन नेहमी त्रास देत व माझ्यावर संशय घेत असत त्यामुळे आमच्यात नेहमी वाद होत होते.दि.31 डिसेंबर रोजी वर्षातील शेटवचा दिवस असल्याने माझे पती खुप जास्त दारु पिले होते व ते मला माझ्या मुलासमोर सारखी शरीरसंबंधाची मागणी करत होते.
मी नकार दिल्याने माझ्यावर संशय घेवुन मला शिवीगाळ करत होते.पहाटे 05/45 वा.सुमारास ते पुन्हा शरीर संबंधाची मागणी करायला लागले व मी नकार दिल्याने त्यांनी माझ्याशी भांडण केले.मी त्यांच्या नेहमीच्या भांडणाला कंटाळून ते लघुशंके करीता बाहेरील वरंड्यात उभे राहिले असता मी त्यांना ढकलुन दिले व ते खाली पडले तेव्हा त्यांच्या कामाच्या पिशवी मध्ये असलेला टॉमी सारखा रॉड काढुन रागाच्या भरात त्यांच्या डोक्यात पाच सहा वार केले.
त्यामध्ये त्याचे डोके फुटुन रक्तस्त्राव होवुन त्यातच त्यांचा मृत्यू झाला.अशी हकिगत सांगितल्याने सदर आ.मू. वरुन श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे गुरंन. 03/2024 भादंवि कलम 302 प्रमाणे गुन्हा दाखल करुन गुन्हयात आरोपी पत्नीस तात्काळ अटक करण्यात आली.ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला,अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर स्वाती भोर तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपूर विभाग डॉ.बसवराज शिवपुजे यांचे मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक हर्षवर्धन गवळी, यांचे कडील तपास पथकातील पोसई/समाधान सोळंके,मपोसई/सुरेखा देवरे, सफौ/सुर्यवंशी,पोहेकॉ/ मच्छिंद्र शेलार,पोना/ भैरवनाथ अडागळे,पोना/ रघुवीर कारखेले,पोना/ सचिनकुमार बैसाने,पोकॉ/ राहुल नरवडे,पोकॉ/गौतम लगड,पोकॉ/संभाजी खरात, पोकॉ/आकाश वाघमारे, मपोकॉ/अरुणा पवार, मपोकॉ/अचर्णा बर्डे यांनी केली असुन दाखल गुन्हयाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी हे करीत आहेत.