Maharashtra247

काँग्रेसच्या शहराध्यक्षांवर प्राणघातक हल्ला

अहमदनगर (दि.३ जानेवारी):-अहमदनगर जिल्ह्यातील हल्ल्याचे सत्र अजून संपता संपेनाच,त्यातच राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे.

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्षावर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना घडली आहे.हा हल्ला दहा ते बारा जणांनी केला आहे अशी धक्कादायक चर्चा पसरली आहे.एका कार्यक्रमाला हजेरी लावलेले काँग्रेसचे शिर्डी शहराध्यक्ष सचिन चौगुले हे काल दि.२ जानेवारी (मंगळवारी) रोजी सायंकाळी कार्यक्रमावरून घरी परतत होते.परत असताना दहा ते बारा जणांनी राहता तालुक्यातील लोणी गावात हा हल्ला केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

प्राणघातक हल्ल्यानंतर त्यांना संगमनेर तालुक्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून उपचार सुरु आहे.दरम्यान काँग्रेसचे आमदार बाळासाहेब थोरात यांनी चौगुले यांची दवाखान्यात जाऊन भेट घेतली.यावेळी त्यांनी ही घटना विरोधकांचा आवाज बंद करण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोप केला असून योग्य कारवाई न केल्यास तीव्र आंदोलन छेडणार असल्याचा इशारा प्रशासनाला दिला आहे.

You cannot copy content of this page