Maharashtra247

नायलॉन मांजा विकणाऱ्यांना आता बसणार चाप;नायलॉन मांजा विक्रेत्यांची माहिती देणार्‍यांना महापालिका देणार ५ हजारांचे बक्षीस या मोबाईल क्रमांकावर करा कॉल नाव राहणार गोपनीय  

अहमदनगर (दि.२ जानेवारी):-नायलॉन मांज्यामुळे अनेक जणांचे गळे,कान,नाक,पक्षी यांना गंभीर इजा होतात त्यातच मुंबई पोलीस दलातील कर्मचाऱ्याला याच नायलॉन माझ्यामुळे आपले प्राण गमवावे लागले.

या मांजाबाबत आता अहमदनगर महापालिका प्रशासन आक्रमक झाले असून, नायलॉन मांजा विक्रेत्यांची माहिती देणार्‍यास पाच हजारांचे रोख बक्षीस मनपाने जाहीर केले आहे.महापालिकेचे प्रशासन अधिकारी आयुक्त डॉ.पंकज जावळे यांच्या आदेशाने या संदर्भात एक बैठक घेण्यात आली.अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रदीप पठारे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या बैठकीस उपायुक्त अजित निकत,सहायक आयुक्त सपना वसावा,स्वच्छता कक्ष प्रमुख परिक्षित बीडकर, प्रसिद्धीप्रमुख शशिकांत नजान,हरियाली संस्थेचे सुरेश खामकर,अभय ललवाणी आदी उपस्थित होते.बैठकीत नायलॉन मांजा विक्रेत्यांवर कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

नायलॉन मांजाची चोरून विक्री केली जाते.त्यामुळे अशा विक्रेत्यांची माहिती देणार्‍याची नावे गोपनीय ठेवण्यात येणार आहेत.ही माहिती ७५८८१६८६७२ या मोबाईल क्रमांकावर द्यावी,असे महापालिका आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांच्याकडून आवाहन करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page