Maharashtra247

मोबाईलवर स्टेटस ठेवत तरुणीची आत्महत्या….प्रियकराचे एकीला आश्वासन मात्र लग्न दुसरी सोबतच…!

अहमदनगर (दि.२ जानेवारी):-अहमदनगर जिल्ह्यात अकोले तालुक्यात प्रेमात फसवणूक झाल्याने तरुणीने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे,हि घटना राजूर गाजावने घाटात घडली आहे.

याप्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अगोदर प्रेमाच्या जाळ्यात ओढले,नंतर लग्नाचे अमीष दाखवत शरीरसंबंध प्रस्थापित केले.त्यातून तिचा दोनदा गर्भपात केला अन् लग्नास नकार देत दुसरीसोबतच लग्र केले.

त्याच्या सोबतचे स्टेटस ठेवत विषारी औषध प्राशन करून तिने जगाचा निरोप घेतला.प्रियकर प्रशांत लोहकरे त्याचा मामा आनंदा उर्फ अनिल सावळेराम देशमुख या दोघांना पोलिसांनी तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या गुन्ह्यात अटक केली आहे.अकोले तालुक्यातील राजूरमधील बेपत्ता तरुणीचा मृतदेह तिसऱ्या दिवशी गाजावणे घाटात आढळला होता.तिच्या वडिलांनी पोलिस फिर्याद दिली आहे.मृत मुलगी नोकरी निमीत्त मुंबई येथे रहात होती.पुतण्याच्या लग्ननिमित्ताने २० डिसेंबरला ती राजुरला आली होती.दि. २७ डिसेंबरला अनिल उर्फ आनंदा सावळेराम देशमुख व प्रकाश लोहकरे दोघे घरी आले.

‘तुमची मुलगी आमचे घरी आली असून गोंधळ करत आहे.तुम्ही तिकडे चला’ असे ते म्हणाले,तिचे आई-वडील माणिक ओझर येथे गेले.काय झाले, तू इकडे का आली, असे असे विचारता मुलीने सर्व प्रकार सांगितला.२०१४ पासून प्रशांत लोहकरे सोबत प्रेमसंबंध आहे. मला फसवून सहा महिन्यापूर्वी त्याने दुसऱ्या मुलीसोबत लग्न केले आहे.गोळ्या देवून दोन वेळा गर्भपात करायला लावला. याबाबत कोणालाही सांगितले नाही.त्यानंतर वडील मुलीला घेवून घरी आले. आनंदा देशमुख याचे मोटारसायकलवर दोघी मायलेकी बसलेल्या होत्या.

‘तुला लई उत आहे ना, तुझा आज रात्री मर्डरच करतो, अशी धमकी आनंदाने मुलीस दिल्याने पत्नीने घरी आल्यानंतर सांगितले. काही वेळेनंतर मुलगी घरातून गायब झाली. ‘प्रशांत लोहकरे मारेल, मला हेल्प करा’ असे स्टेटस तिने ठेवल्याचे समजले. तिचा शोध घेतला, मात्र ती मिळून आली नाही, त्यामुळे पोलिसांत बेपत्ता असल्याची खबर दिली. त्यांनतर तिचा मृतदेह आढळून आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

You cannot copy content of this page