अहमदनगर (दि.८ जानेवारी):-नगर शहरातील तरुणांना अश्लील चाळे करण्यास कॅफे उपलब्ध करुन देणा-या 6 कॅफे चालकांविरुध्द स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करत गुन्हे दाखल केले आहे.
शहरातील कॅफेत छोटी छोटी कम्पांर्टमेंट बनवुन तरुण मुला-मुलींना अश्लील चाळे करण्यासाठी मोबदला घेवुन जागा उपलब्ध केली जाते अशा तक्रारी जिल्हा पोलिस अधीक्षक श्री.राकेश ओला यांना प्राप्त झाल्याने स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि/श्री.दिनेश आहेर यांना अहमदनगर शहरातील कॅफेची तपासणी करुन कायदेशीर कारवाई करणे बाबत जिल्हा पोलीस अधीक्षकांनी आदेशित केले होते.नमुद आदेशान्वये पोनि/श्री.दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार यांची दोन पथके नेमुन माहिती घेवुन अश्लिल चाळे करणारे जोडपे (कपल) मिळुन आल्यास कारवाई करणे बाबत सुचना दिल्या.पथकाने दि.08 जानेवारी 24 रोजी सावेडी उपनगरातील 1)श्रीराम चौक, पाईपलाईन रोड येथील लव्ह बर्डस कॅफे, 2) कुष्ठधाम रोड येथील बाबाज कॅफे, 3) गुलमोहर रोड येथील हर्षाज कॅफे, 4) नगर मनमाड रोडवरील कोहिनुर मॉल समोरील झेड के कॅफे, अहिंसा चौक,बुरुडगांव रोड, इगलप्राईड कॉम्प्लेक्स मधील 5) गोल्डरश कॅफे व चाणक्य चौकातील 6) रिजकिंग कॅफे अशा ठिकाणी जावुन खात्री केली असता तरुण मुल मुली अश्लील चाळे करताना मिळुन आल्याने कॅफे चालकास कॅफे चालविण्याचा परवाना बाबत विचारपुस केली असता त्यांनी कॉफी शॉपचा परवाना नसताना कॉफी शॉपचा बोर्ड लावुन कुठलीही कॉफी,पेय अगर खाद्यपदार्थ विक्रीस न ठेवता आतमध्ये मुलामुलींना बसण्यासाठी कम्पार्टमेंट बनवल्याने आरोपीं विरुध्द कारवाई करुन कोतवाली व तोफखाना पोलीस स्टेशन येथे महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 129, 131 (क)(क) प्रमाणे तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
कॅफेमध्ये मिळुन आलेल्या तरुण मुला मुलींचे पालकांना बोलावुन त्याचे समक्ष तरुणांना समज देवुन पालकाच्या ताब्यात देण्यात आले आहे.पुढील कारवाई कोतवाली व तोफखाना पोलीस स्टेशन करीत आहे.
हि कारवाई श्री.राकेश ओला पोलीस अधीक्षक,श्री.प्रशांत खैरे अपर पोलीस अधिक्षक,श्री.हरीष खेडकर उपविभागीय पोलीस अधिकारी नगर शहर विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोसई/तुषार धाकराव,सोपान गोरे, पोहेकॉ/संदीप पवार,अतुल लोटके,पोकॉ/सागर ससाणे, अमृत आढाव,रविंद्र घुंगासे, बाळासाहेब गुंजाळ,जालिंदर माने,मपोहेकॉ/भाग्यश्री भिटे, मपोकॉ/सोनाली साठे, चासफौ/उमाकांत गावडे, चापोकॉ/अरुण यांनी केलेली आहे.