अहमदनगर (दि.८ जानेवारी):-महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंधीत असलेली सुगंधी तंबाखु,पानमसाला व गुटखा विक्री करीता वाहतुक करणा-या 3 आरोपी विरुध्द स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करुन 12,40,000/- रु.किंचा मुद्देमाल जप्त केला आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. राकेश ओला यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि/श्री.दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनानुसार अहमदनगर जिल्ह्यातील अवैध धंद्यांची माहिती घेवुन त्यावर कायदेशीर कारवाई करणेसाठी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला आदेशित केले होते.नमुद आदेशान्वये पथक अवैध धंद्यांची माहिती घेत असताना पोनि/श्री. दिनेश आहेर यांना गुप्तबातमीदारा मार्फत माहिती मिळाली की,इसम नामे 1)शाहरुख शहा, 2) नदीम शेख व 3) रिजवान शेख सर्व रा.वार्ड नं.2, ता. श्रीरामपूर हे त्यांचा हस्तक नामे दानिश सय्यद रा.वार्ड नं.2, ता. श्रीरामपूर व त्याचा साक्षीदार यांचे मार्फतीने सुगंधीत तंबाखु,पानमसाला व गुटखा हा राजु शेख व वसीम रा.बीड यांचे कडुन खरेदी करुन,विक्री करण्याचे उद्देशाने अशोक लेलँड कंपनीचा टेम्पो व टाटा इंडीगो कार यामधुन बीड जामखेड मार्गे अहमदनगर शहरात विक्री करण्यासाठी येणार आहे.
अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोनि/श्री.दिनेश आहेर यांनी पथकास माहिती देवुन पंचांना सोबत घेवुन खात्री करुन कारवाई करणे बाबत कळविल्याने.पथकाने लागलीच पंचांना सोबत घेवुन जामखेड रोडने चिचोंडी पाटील गावचे शिवारात सापळा लावुन थांबलेले असताना थोडाच वेळात बातमीत नमुद प्रमाणे वाहने येताना दिसल्याने दोन्ही संशयीत वाहनांना बॅटरीच्या सहाय्याने थांबण्याचा इशारा करुन दोन्ही गाड्या थांबवुन गाडीतील इसमांना पथकाची ओळख सांगुन त्यांचे नाव गांव विचारले असता त्यांनी त्यांची नावे 1) दानिश मोहंमद सय्यद 2) जाकिर कादर शेख दोन्ही रा.सुभेदारवस्ती,ता. श्रीरामपूर व 3) अफसर हसन पठाण रा.जवाहरवाडी, एकलहरे,ता.श्रीरामपूर असे असल्याचे सांगितले.
पंचासमक्ष संशयीतांचे ताब्यातील वाहनांची पाहणी करता त्यमध्ये महाराष्ट्र राज्यात विक्रीस व वाहतुकीस प्रतिबंधीत असलेली सुगंधी तंबाखु, पानमसाला,गुटखा मिळुन आल्याने त्याबाबत अधिक विचारपुस करता आरोपींनी सदर माल हा 4) शाहरुख शहा (फरार), 5) रिजवान शेख (फरार) व 6) नदीम शेख (फरार), दोन्ही रा. वॉर्डा नं.2, ता. श्रीरामपूर यांचे सांगणेवरुन 7) राजु शेख (फरार) व 8) वसीम (फरार) दोन्ही रा. मोमीनपुरा, जिल्हा बीड यांचे कडुन घेवुन आलो असल्याची माहिती दिल्याने आरोपींना विविध प्रकारची सुगंधी तंबाखु,गुटखा, पानमसाला,एक अशोक लेलँड कंपनीचा टेम्पो व एक टाटा इंडीगो कार असा एकुण 12,40,000/- रुपये किंमतीचे मुद्देमालासह ताब्यात घेवुन त्यांचे विरुध्द पोकॉ/1699 शिवाजी अशोक ढाकणे ने.स्थागुशा यांचे फिर्यादी वरुन नगर तालुका पोलीस स्टेशन गु.र.नं. 10/2024 भादविक 328, 188, 272, 273, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील कायदेशिर कारवाई नगर तालुका पोलीस स्टेशन करीत आहे.सदरची कारवाई श्री. राकेश ओला पोलीस अधीक्षक,श्री.प्रशांत खैरे अपर पोलीस अधिक्षक,श्री.संपत भोसले उपविभागीय पोलीस अधिकारी,नगर ग्रामिण विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोसई/तुषार धाकराव,पोहेकॉ/सचिन आडबल,पोना/संतोष खैरे, पोकॉ/शिवाजी ढाकणे, किशोर शिरसाठ यांनी केलेली आहे.