Maharashtra247

हिवरगाव पावसा येथे विकसित भारत संकल्परथ यात्रेस उत्स्फूर्त प्रतिसाद;खा.सदानंद तानवडे यांच्या हस्ते घरकुल लाभार्थ्यांना चाव्या वाटप 

संगमनेर (नितीन भालेराव):- संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथे विकसित भारत संकल्परथ यात्रेचे उत्स्फूर्तपणे स्वागत करण्यात आले.

विकसित भारत संकल्प रथ यात्राला वाजत गाजत मिरवणुकीने सुरुवात झाली. खा.सदानंद तानवडे राज्यसभा सदस्य तथा प्रदेशाध्यक्ष गोवा भाजपा,गटविकास अधिकारी अनिल नागणे,भाजपा तालुकाध्यक्ष वैभव लांडगे,माजी भाजपा तालुकाध्यक्ष काशिनाथ पावसे,सरपंच सुभाष गडाख,यांची रथातून ग्रामस्थांनी मिरवणूक काढली.

सदर मिरवणुकीत देवगड विद्यालयाचे लेझीम पथक सहभागी झाले होते.शासनाच्या विभागांनुसार योजनांचे स्टॉल लावून ग्रामस्थांना माहिती देण्यात आली. खा.सदानंद तानवडे यांच्या हस्ते घरकुल लाभार्थ्यांना चावी वाटप,आयुष्यमान भारत कार्ड,बेबी कीटचे वाटप तसेच शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्र,चेकचे वाटप करण्यात आले.

हिवरगाव पावसा सांस्कृतिक सभागृहामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून कार्यक्रमास सुरुवात झाली. जि.प. शाळा उंबरवाडी विद्यार्थांनी धरती कारे पुकार या नाटीका सादरीकरणातून रासायनिक खतांचे दुष्परिणाम व पर्यावरण संवर्धन संदेशात्मक समाज प्रबोधन केले.त्यानंतर गटविकास अधिकारी अनिल नागणे यांनी प्रास्ताविक करताना म्हणाले कि, केंद्र सरकारच्या व राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनांचे फायदे लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावेत, या उद्देशाने ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ ही देशव्यापी मोहीम केंद्र सरकारकडून सुरू करण्यात येत आहे. तिचे उद्‍घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झारखंड मध्ये झाले. विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून सरकारच्या योजनांचे फायदे नागरिकां पर्यंत पोहचविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने उत्कृष्ट नियोजन केले आहे.

त्यानुसार संगमनेर प्रशासनाने उत्कृष्ट नियोजन करत तालुक्यातील १०९ गावांमध्ये यशस्वीपणे पोहोचवली आहे.आयुष्मान भारत कार्ड योजनेचा पत्र लाभार्थाना लाभ मिळावा यासाठी नोदणी करणे व कार्ड वाटप करण्याचे काम तालुक्यात मोठ्या प्रमाणात चालू आहे.प्रधानमंत्री मातृत्तव वंदना योजना,जननी सुरक्षा योजना,स्तनदा व गरोदर माता नियमित तपासणी,पोषण आहार आरोग्य विभाग व अंगणवाडी मार्फत दिली जात आहे.विशेष घटकानसाठी च्या योजना तसेच इतर लाभाच्या योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहचविण्याचे मोठ्याप्रमाणात प्रशासना मार्फत चालू आहे.

खा.सदानंद तानवडे यांनी आपल्या भाषणात हिवरगाव पावसा येथे विकसित भारत संकल्प रथ यात्रेस उस्पुर्तपणे स्वागत केल्याबद्दल सर्व ग्रामस्थांचे,देवगड विद्यालयाच्या लेझीम पथकातील विद्यार्थिनींचे आभार मानले,प्रशासना मार्फत हिवरगाव पावसा येथे योजनाची माहिती शिबिराच्या माध्यमातून नागरिकांना देत जात आहे. येथे खूपच सुंदररित्या अंगणवाडी कर्मचारी बालकांसाठी अवश्यक सकस पोषण आहाराची माहिती देत आहेत.त्याबद्दल त्यांनी अंगणवाडी शिक्षिका,कर्मचाऱ्यांचे कौतुक केले.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सन २०४७ पर्यंत विकसित भारत करण्याची संकल्प तयार केली आहे.त्यानुसार विकसित देशासाठी आधी नागरिकांची प्रगती झाली पाहिजे.देशाच्या विकासात सर्वांचा सहभाग महत्वाचा आहे.भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी याच्या कार्यकाळात बिपीएल खालील टक्केवारी २२% वरून १२% वर आली आहे.कोव्हिड काळात करोडो जनतेला मोफत लसीकरण मोहीम यशस्वीपणे राबविण्यात आली.शेतकरी व महिला सबलीकरण,बचत गटांसाठी विविध योजना राबवत आहे.

सरकारच्या योजना सर्व घटकांन पर्यंत पोहचविल्या पाहिजे,अनेक योजनाची माहिती नसल्याने त्यांचा लाभ नागरिकांना घेता येत नाही.त्यामुळे केंद्र सरकारच्या व राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनांचे फायदे लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावेत, या उद्देशाने ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ ही देशपातळीवर राबवली जात आहे. संगमनेर प्रशासनाने उत्कृष्ट नियोजन करत तालुक्यातील १०९ गावांमध्ये यशस्वीपणे पोहोचवली त्याबद्दल खा.सदानंद तानवडे यांनी अधिकारी,कर्मचारीवर्ग तसेच विद्यार्थी,नागरिकांचे अभिनंदन केले.

विकसित भारत संकल्प रथ यात्रेनिमित्त जिल्हा उपाध्यक्ष अशोक कानवडे,नारायण काळे जिल्हा पंचायतराज व ग्रामविकास संयोजक,रोहिदास धुमाळ विभागीय संयोजक पंचायतराज,दीपक भगत,अशोक ननवरे,विस्तार अधिकारी कासार,उपसरपंच सुजाता दवंगे,उत्तम जाधव अध्यक्ष देवगड देवस्थान,यादवराव पावसे संपादक कृषी साधना इ.मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रामसेवक हरिष गडाख,डॉ.पवनकुमार गायकवाड,तलाठी माधुरी नामदे,कृषी सहाय्यक अर्चना शिंदे, अंगणवाडी सुपरवायझर शकुंतला कासार,परिचारिका नेहे एन.पी,अशासेविका स्वाती पावसे,गणेश दवंगे,केशव दवंगे, गणेश पावसे,सोमनाथ भालेराव,मच्छिंद्र गडाख,चंद्रशेखर गडाख,सचिन सस्कर,दिगंबर पावसे,प्रकाश पावसे,किरण पावसे,भाऊसाहेब पावसे,ज्योती पावसे,रावसाहेब जयवंत पावसे,अशोक गोफणे,दिलीप पावसे,देवगड विद्यालयातील शिक्षक वर्ग,अंगणवाडी सेविका,सर्व संस्था पदाधिकारी,ग्रामस्थांनी सहकार्य केले.

You cannot copy content of this page