
अहमदनगर (दि.१२ जानेवारी):-अहमदनगर शहरातील व्यापा-याचे गल्ल्यातील रोख रक्कम चोरी करणारे व घरफोडी करणारे 2 सराईत आरोपी 2,60,000/रुपयांच्या मुद्देमालासह जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला मोठे यश आले असून त्यांच्याकडून 3 गुन्हे उघडकीस आले आहे.
बातमीची हकिगत अशी की,यातील फिर्यादी श्री. गुलाब पांडुरंग कराळे (धंदा कॉन्ट्रॅक्टर रा.वाकोडी,ता. नगर) यांचे ऑफिसमध्ये लॉक असलेल्या ड्रॉव्हर मधील 3,00,000/- रुपये रोख रक्कम कोणीतरी अनोळखी चोरट्याने चोरुन नेले बाबत तोफखाना पोलीस स्टेशन गु.र.नं. 34/2024 भादविक 454,380 प्रमाणे घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.तसेच नोव्हेंबर 2023 मध्ये दिवाळी सणाचे कालावधीत अहमदनगर शहरातील व्यापारी फिर्यादी श्री.दिपक टेकचंद आहुजा यांचे दुकानातील 2,00,000/- रुपये रोख रक्कम 1 अनोळखी इसमाने गल्ल्यात हात घालुन चोरुन नेली होती.
व फिर्यादी श्री. विकी श्रीचंद हरदवाणी हे दुकानातील रोख रक्कम बॅगेत ठेवुन घराचे गेट जवळ उभे असताना अनोळखी 2 आरोपींनी 50,000/- रुपये रोख रक्कम असलेली बॅग हिसकावुन घेवुन गेले होते.या दोन्ही घटनेनंतर व्यापारी वर्ग व नागरीकांमध्ये घबराटीचे व भितीचे वातावरण निर्माण झाल्याने,नगर शहराचेआमदार श्री.संग्राम जगताप यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांना नमुद गुन्हे उघडकिस न आल्यास पोलीस प्रशासना विरुध्द उपोषण करण्याचा इशारा निवेदनाव्दारे दिल्याने पोलीस दलासमोर गुन्हे उघडकिस आणण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले होते.
परंतु या घटनेचे गांभिर्य लक्षात घेवुन जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि/श्री.दिनेश आहेर यांना स्थानिक गुन्हे शाखेचे पथक नेमुन गुन्ह्याचा समांतर तपास करुन,गुन्हा उघडकिस आणणे बाबत आदेशित केले होते.नमुद आदेशान्वये पोनि/श्री.दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक नेमुन गुन्ह्यांचा समांतर तपास करुन गुन्हे उघडकिस आणणे बाबत आवश्यक सुचना देवुन पथकास रवाना केले.
पथक रेकॉर्डवरील गुन्हेगारांची माहिती घेताना पोनि/श्री. दिनेश आहेर यांना गुप्तबातमीदारा मार्फत माहिती मिळाली की,वर नमुद गुन्हे हे आरोपी नामे विठ्ठल घोडके व सचिन घोडके रा. घोसपुरी,ता.नगर यांनी केला असुन ते गुन्ह्यात चोरी केलेली रोख रक्कम घेवुन स्प्लेंडर मोटार सायकलवर बाहेरगावी जाणार असुन अहमदनगर शहरात येणार आहेत.अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोनि/श्री.दिनेश आहेर यांनी प्राप्त माहिती पथकास देवुन खात्री करुन कारवाई करणे बाबत सुचना देवुन पथकास तात्काळ रवाना केले.
पथकाने लागलीच हॉटेल सोनाली,नगर दौंड रोड येथे सापळा लावुन थांबलेले असताना दोन संशयीत इसम स्प्लेंडर मोटार सायकलवर येताना दिसले.पथकाची खात्री होताच त्यांना हात दाखवुन थांबण्याचा इशारा करताच ते पोलीस पथकास पाहुन पळुन जावु लागले.पथकाने त्यांचा पाठलाग करुन दोन्ही संशयीतांना शिताफीने ताब्यात घेतले.त्यांची पंचासमक्ष अंगझडती घेतली असता त्यांचे अंगझडतीत 1,60,000/- रुपये रोख रक्कम मिळुन आली त्याबाबत विचारपुस केली असता सुरुवातीस ते उडवा उडवीची उत्तरे देवु लागले.
त्यांना विश्वासात घेवुन सखोल व बारकाईने चौकशी करता त्यांनी दि. 08/01/24 रोजी दिल्लीगेट येथील ऑफिसमधील रोख रक्कम तसेच दिवाळीचे काळात अहमदनगर शहरातील व्यापा-याचे गल्ल्यातुन व एका इसमाचे गाडीचे हँडलला लावलेली पैशाची बॅग चोरी केलेली रक्कम असले बाबत कबुली दिल्याने दोन्ही आरोपींना मुद्देमालासह ताब्यात घेतले.त्यानंतर आरोपींकडे अधिक चौकशी करता त्यांनी काही रक्कम घरात ठेवली असल्याचे सांगितल्याने आरोपी नामे विठ्ठल घोडके याचे घरातुन 40,000/- व सचिन घोडके याचे घरातुन 10,000/- रुपये रोख रक्कम हस्तगत केली आहे.
ताब्यातील आरोपींना विश्वासात घेवुन अहमदनगर जिल्ह्यात आणखी किती ठिकाणी व कोठे कोठे चोरी केली आहे या बाबत विचारपुस केली असता आरोपींनी दिवाळीचे कालावधीत चोरी केल्याची कबुली दिल्याने अहमदनगर जिल्हा गुन्हे अभिलेख पडताळणी करता खालील प्रमाणे 03 गुन्हे दाखल असुन उघडकिस आले आहेत.आरोपी नामे विठ्ठल संजय घोडके हा सराईत गुन्हेगार असुन त्यांचे विरुध्द चोरीचे 05 गुन्हे दाखल आहेत.ताब्यातील दोन्ही आरोपींना 210000/- रोख रक्कम व 50000/- रुपये किंमतीची स्प्लेंडर मोटार सायकल असा एकुण 2,60,000/- रुपये किंमतीचे मुद्देमालासह तोफखाना पोलीस स्टेशन येथे हजर केले असुन पुढील तपास तोफखाना पोलीस स्टेशन करीत आहे.हि कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. राकेश ओला,श्री.प्रशांत खैरे अपर पोलीस अधिक्षक,श्री. हरीष खेडकर उपविभागीय पोलीस अधिकारी,नगर शहर विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि/हेमंत थोरात,पोहेकॉ/सुनिल चव्हाण,संदीप पवार,देवेंद्र शेलार,पोना/रविंद्र कर्डीले, भिमराज खर्से,पोकॉ/अमृत आढाव,मेघराज कोल्हे,प्रशांत राठोड व चापोहेकॉ/संभाजी कोतकर यांनी केलेली आहे.