
पुणे प्रतिनिधी (दि.१३ जानेवारी):-महाराष्ट्र शासन पवित्र पोर्टलद्वारे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये साधन व्यक्ती नियुक्ती केली जाणार आहे.
इंग्रजी माध्यमाला कुठल्याही पद्धतीचे वेगळे आरक्षण असू नये असा निर्णय न्यायालयाने दिलेला होता परंतु त्याला डावलून आता इंग्रजी माध्यमाच्या मुलांना वेगळा न्याय देऊन या भरती मध्ये भेदभाव केला जात आहे.सध्या शिक्षण आयुक्त कार्यालयाबाहेर डीटीएडबीएड स्टुडंट असोसिएशन तर्फे शिक्षक उमेदवार आंदोलन करीत आहेत.
त्या आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन आम आदमी पार्टीच्या वतीने आंदोलकांना पाठिंबा देण्यात आला.तसेच शिक्षण उपआयुक्त जगदाळे यांच्याशी या विषयी चर्चा केली.सध्या २५,००० हजार शिक्षक भरती असेल असे सांगीतले जात आहे.सद्या दोन लाख सोळा हजार उमेदवार असून त्यात केवळ १० हजार इंग्रजी माध्यमाने पदवीधारक आहेत.गुणवत्ता डावलून इंग्रजी माध्यमाला प्राधान्य हे न्याया विरोधात आहे.
तसेच शिक्षक भरती तरतुदी बाबतचा दि.१३ ऑक्टोबर २०२३ चा हा अन्यायकारक शासन निर्णय तात्काळ रद्द न झाल्यास आम आदमी पक्षाकडून तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा प्रशासनाला आम आदमी पक्षाच्या वतीने देण्यात आला.यावेळी राज्य प्रवक्ते मुकुंद किर्दत, शिक्षक आघाडी शहराध्यक्षा शितल कांडेलकर,निरंजन अडागळे,अमित मस्के,मयूर कांबळे,संजय कोणे,प्रीती निकाळजे,संतोष मगर यांनी उपस्थित राहून डी. टी.एड.बी.एड.स्टुडंट असोसिशन अध्यक्ष संतोष मगर यांना पाठिंबा पत्र दिले.