Maharashtra247

अहमदनगर पुन्हा हादरले…कोयत्याने वार करून तरुणाचा खून

श्रीगोंदा प्रतिनिधी:-अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात कोथूळ येथे अज्ञात चार जणांनी घरात घुसून चाकूचा धाक दाखवत एकाच्या गळ्यावर कोयत्याने वार करत गंभीर जखमी केले.

या घटनेत योगेश सुभाष शेळके (वय ३५) या तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (दि ३०) जानेवारी रोजी पहाटे घडली.या प्रकरणी बेलवंडी पोलीस ठाण्यात आरती योगेश शेळके (वय २६) यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चार इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मात्र

या घटनेचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून याप्रकरणी बेलवंडी पोलीस तसेच स्थानिक गुन्हे शाखा सर्व बाजूने सखोल तपास करत आहे.याप्रकरणी दोन संशयित इसमांना ताब्यात घेतल्याची माहिती मिळत असून इतर आरोपींच्या शोधात पोलीस पथके रवाना केले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संतोष भंडारे यांनी दिली. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक राकेश ओला,अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे,उपविभागीय पोलीस अधिकारी विवेकानंद वाखारे यांनी धाव घेतली.

You cannot copy content of this page