Maharashtra247

अहमदनगर जिल्ह्यातील वकील दांपत्याचा खून प्रकरणी नांदेड जिल्हा अभिवक्ता संघाच्या वतीने निवेदन हा खटला जलदगती न्यायालयात चालवून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी

नांदेड प्रतिनिधी (दि.३० जानेवारी):-अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात दि.२५ जानेवारी २०२४ रोजी वकील दांपत्य ॲड.राजाराम आढाव व पत्नी ॲड.मनीषा आढाव यांचा निर्घृणपणे खून करण्यात आला होता.

या घटनेचा तपास करत अहमदनगर जिल्ह्यातील स्थानिक गुन्हे शाखेला यातील पाच आरोपींना जेरबंद करण्यात यश आले आहे.या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता,महाराष्ट्रात ठीक ठिकाणी वकील संघाच्या वतीने निवेदने देण्यात आली.त्यातच आज दि.३० जानेवारी २०२४ रोजी नांदेड जिल्हा अभिव्यक्ता संघाच्या वतीने जिल्हाधिकारी,राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना या बाबत निवेदन दिले आहे.

याबाबत निवेदनात म्हटले आहे की,दि.२५ जानेवारी २०२४ रोजी अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात वकील दांपत्याचा खून करणाऱ्या आरोपीं विरोधात लवकरात लवकर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करून हा खटला जलदगती न्यायालयात चालवून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आदेशित करणे बाबत,वकील संरक्षण कायदा तात्काळ पारित करून लागू करण्यात यावा,वकिलांना मागणीप्रमाणे तात्काळ शस्त्र परवाना उपलब्ध करून देण्यात यावा, प्रत्येक न्यायालयीन परिसरात वकिलांच्या सुरक्षेसाठी कायमस्वरूपी पोलीस चौकी उभारावी असे निवेदन देण्यात आले.

या वेळी अध्यक्ष ॲड.आशिष गोधमगावकर,उपाध्यक्ष ॲड. संजय वाकोडे,सचिव ॲड.अमोल वाघ,सहसचिव ॲड.रशीद शेख,कोषाध्यक्ष ॲड.मारोती बादलगावकर, विशिष्ट सहाय्यक ॲड. जयपाल ढवळे, ॲड.ए.बी.भगत,ॲड.ज्योती सूर्यवंशी,ॲड.मंगल पाटील, ॲड.गोपाल भोसले,ॲड.प्रीतीश टेकाळे, ॲड.यशोनील मोगले,ॲड.नगमा ए.जमजम काजी मो.अमिनोद्दीन सिद्दीकी,ॲड.वनिता बोईनवाड,ॲड.हनुमंत नरंगले,ॲड.पिराजी कदम, ॲड.संदीप ढगे,ॲड.प्रभज्योत रामगडिया,ॲड.आकाश खाडे इ.उपस्थित होते.

You cannot copy content of this page