राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ चिन्ह ‘या’ गटाला निवडणूक आयोगाचा निर्णय
मुंबई (प्रतिनिधी):-राष्ट्रवादीतून फुटलेल्या मा.उपमुख्यमंत्री अजित पवार गटाला पक्षाचे नाव व घड्याळ हे चिन्ह देण्यात येत असल्याचा निर्णय निवडणूक आयोगाने दिला आहे.या निर्णयामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.यामुळे शरद पवार गटाला धक्काच बसला आहे.
त्यामुळे आगामी निवडणुकीत शरद पवार गटाला पक्षचिन्ह आणि पक्ष नावासाठी तीन पर्याय सुचवण्याचे निर्देश निवडणूक आय़ोगाने दिले आहेत.त्यामुळे येत्या निवडणुकीत शरद पवार गटाला वेगळ्या चिन्हावर आणि नावावर निवडणूक लढवावी लागेल हे या निर्णयाने स्पष्ट झाले आहे.